नवी दिल्ली 28 मार्च : पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांवरील विश्वास अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो. दोघांमधील एकानेही विश्वासघात केला, तर संसार तुटायला फार वेळ लागत नाही. यानंतर काही कारणाने दोघे वेगळे जरी झाले नाहीत तरी यानंतर त्यांच्यातील विश्वास संपतो. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं, जेव्हा तिच्या पतीने तिचा विश्वासघात करून तिच्याच बहिणीशी संबंध ठेवले.
लग्नानंतर चारच दिवसांत तरुणाचा पुन्हा मेहुणीसोबत विवाह; प्रेम नाही, 'हे' आहे यामागचं अजब कारण
मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेने तिच्यासोबतची ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिला वाटलं की तिचा नवरा तिची खूप काळजी घेतो आणि त्याच्यापेक्षा चांगलं कोणीही असू शकत नाही. दरम्यान, जेव्हा तिला पतीच्या अफेअरबद्दल समजलं तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता. कारण पती तिच्याशी खूप चांगलं वागायचा.
Reddit वर तिची कहाणी सांगताना महिलेनं म्हटलं, की तिच्या पतीने तिची फसवणूक करत तिच्याच बहिणीशी संबंध ठेवले. पत्नीची बहीण गरोदर होईपर्यंत त्याने ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. ही गोष्ट पत्नीला आणखीनच त्रास देणारी होती, की दोघीही एकाच वेळी गरोदर राहिल्या. महिलेनं सांगितलं की, तिच्या पतीने तिची माफी मागितली आणि तिला सांगितलं की, त्याचे फक्त मेहुणीसोबत संबंधच नाहीत तर आता ती त्याच्या जुळ्या मुलांची आईदेखील होणार आहे. हे ऐकून महिलेला धक्का बसला, कारण तीदेखील लवकरच बाळाला जन्म देणार होती.
महिलेनं सांगितलं की, तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि महागड्या भेटवस्तूही द्यायचा. महिलेचं म्हणणं आहे की, नवरा कदाचित तिला घटस्फोट देऊन तिच्या बहिणीसोबत नवीन आयुष्य सुरू करणार होता, पण पत्नी गरोदर असल्याचं समजल्यावर त्याने तसं केलं नाही. आर्थिक सुरक्षेसाठी महिलाही त्याला सोडू इच्छित नाही. मात्र लोकांनी या महिलेला पतीला घटस्फोट देण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love story, Viral news, Wife and husband