मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ब्युटी सलूनमध्ये गेली म्हणून बायकोला भयानक शिक्षा; नवऱ्याच्या संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL

ब्युटी सलूनमध्ये गेली म्हणून बायकोला भयानक शिक्षा; नवऱ्याच्या संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL

ब्युटी सलूनमध्ये जाऊन सर्वांसमोर नवऱ्याने बायकोला मारहाण केली.

ब्युटी सलूनमध्ये जाऊन सर्वांसमोर नवऱ्याने बायकोला मारहाण केली.

बायको ब्युटी सलूनमध्ये गेल्याने संतप्त झालेल्या नवऱ्याने तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं.

    अश्गाबात, 17 ऑगस्ट : आपली बायको सुंदर दिसावी असं कुणाला वाटणार नाही. काही पुरुष आपल्या बायकांना ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करतात तर काही पुरुषांना आपल्या बायकोने ब्युटी पार्लरमध्ये गेलेलं आवडत नाही त्यांना त्यांचं नैसर्गिक सौंदर्य आवडत असतं. पण नवऱ्याला आवडत नसूनही एखादी महिला ब्युटी पार्लरमध्ये गेली तर फार फार तर काय होईल नवरा रागवेल, फार फार तर भांडेल. पण एका नवऱ्याने मात्र ब्युटी सलूनमध्ये गेलेल्या आपल्या बायकोला भयानक शिक्षा दिली आहे. आपली बायको ब्युटी सलूनला गेली आहे हे समजताच नवरा संतप्त झाला. तोसुद्धा तिच्या मागे त्या ब्युटी सलूनमध्ये पोहोचला. तिथं जाऊन त्याने सर्वांसमोर बायकोला मारहाण करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोसोबत केलेल्या संतापजनक कृत्याचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओत पाहू शकता बऱ्याच महिला आणि त्यांच्यामध्ये एक पुरुष दिसतो आहे. हा पुरुष एका महिलेला मारतो आहे. हे दोघंही नवरा-बायको आहेत. सुरुवातीला नवरा बायकोला धक्का मारतो. त्यानंतर तो दरवाजाच्या दिशेने जातो. पुन्हा मागे येऊन तो बायकोवर हल्ला करतो. लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण करताना दिसतो. हे वाचा - VIDEO: 90 सेकंदात रिक्षाचालकाला 17 वेळा कानशिलात लगावल्या; महिलेची क्रूरता पाहून येईल संताप त्याला मारताना पाहून तिथं तिथं असलेल्या ब्युटिशिअन आणि इतर महिला ग्राहकही इतक्या घाबरतात की कुणाचीही त्या व्यक्तीला रोखण्याची हिंमत होत नाही. सर्वजणी त्यांच्यांपासून दूर पळतात कुणीच त्यांच्या जवळ जात नाही, त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करत नाही. तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबातजवळील क्योशी जिल्ह्यातील ही घटना आहे. तुर्कमेनिस्तान सरकारने महिलांच्या अधिकाऱ्यांवर बऱ्याच मर्यादा आणल्या आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार इथं महिलांसाठी ब्यूटी सलूनमध्ये जाणंही खतरनाक झालं आहे. इथं ब्युटिशिअन्स आपलं काम अंडरग्राऊंड पद्धतीने करतात. जर याची माहिती सरकारला मिळाली तर त्यांना जेलमध्येही डांबलं जातं. हे वाचा - 9 बायका फजिती ऐका! मजेमजेत एकाच वेळी केलं 9 जणींशी लग्न; आता झाला भलताच वांदा महिलांना ब्युटी पार्लरमध्ये पकडल्यानंतर त्यांचे पती किंवा वडिलांकडून दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड इतका असतो की काही महिन्यांची सॅलरही जाते.  रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी अशा सलूनवर छापाही टाकला आहे. ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करणाऱ्या काही महिलांना खूप वेगळ्या दिसतात म्हणून त्यांना अटक केली होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Wife and husband, World news

    पुढील बातम्या