फ्लोरिडा, 23 सप्टेंबर : एक पत्नी आपल्या पतीसाठी काय करू शकते हे अनेक कथातून आपण ऐकतो, मात्र फ्लोरिडात घडलेला प्रकार अंगावर काटावर आणणारा आहे. इथं एका गरोदर पत्नीनं शार्कच्या जबड्यात अडकलेल्या आपल्याला पतीला वाचवण्यासाठी पुढचा मागचा विचार न करता पाण्यात उडी मारली.
फ्लोरिडामध्ये ही घटना घडली. 30 वर्षीय अँड्र्यू चार्ल्स एडीवर 3 मीटर लांब शार्कनं हल्ला केला. अँड्र्यू आपल्या कुटुंबासोबत एका खासगी बोटीवर होते आणि ते सॉम्ब्रेरो की लाईटहाऊसजवळ स्नॉर्केलिंग करीत होते, त्यावेळी हा प्रकार घडला.
वाचा-भारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL
मियामी हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, स्नॉर्केलिंग करत असताना अचानक पाण्यातून जाणाऱ्या शार्कनं अँड्र्यूवर हल्ला केला. पाण्यात रक्त पाहून त्याची पत्नी घाबरली. अँड्र्यूची पत्नी मार्गोट गरोदर असून तिनं पुढचा मागचा विचार न करता पतीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि पतीला शार्कच्या जबड्यातून बाहेर काढले.
वाचा-VIDEO : खरा हिरो! बाबागाडीतून घरंगळत जाणाऱ्या चिमुकल्याचा धूम स्टाईलनं वाचवलं
हा हल्ला झाला तेव्हा अँड्र्यूचे कुटुंबिय पाण्यातच होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा शार्क तीन मीटर लांब होता. सीबीएस मियामीच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यानंतर अँड्र्यूला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती नाही आहे. अँड्र्यूवर हल्ला करण्यात आलेला बुल प्रकारचा शार्क मासा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाचा-महाकाय अजगरानं श्वानाला गिळलं, शिकारीचा थरारक VIDEO VIRAL
फ्लोरिडा संग्रहालयाच्या म्हणण्यानुसार, बुल शार्क प्राणघातक हल्ले करण्यासाठी ओळखले जातात. जगभरातून त्यांनी आतापर्यंत 100हून अधिक हल्ले केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral