मराठी बातम्या /बातम्या /Viral /भर रस्त्यात जोडप्याचं भांडण; बायको नवऱ्याला भांड्याने मारताना दिसली, Video Viral

भर रस्त्यात जोडप्याचं भांडण; बायको नवऱ्याला भांड्याने मारताना दिसली, Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

नवरा बायकोचं नातं कधी तिखट कधी गोड असलेलं पहायला मिळतं. . आयुष्यात कोणत्याही प्रकारचे चढ-उतार आले तर एकमेकांचा हात धरूनच आयुष्य आनंदाने घालवावे लागते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : नवरा बायकोचं नातं कधी तिखट कधी गोड असलेलं पहायला मिळतं. . आयुष्यात कोणत्याही प्रकारचे चढ-उतार आले तर एकमेकांचा हात धरूनच आयुष्य आनंदाने घालवावे लागते. वैवाहिक जीवन जगत असताना अशा परिस्थिती उद्भवतात, ज्यामुळे मतभेद निर्माण होतात आणि भांडणाचे कारण बनतात. त्यांचा रुसवा भुगवाही नात्याला घट्ट् करत असतो. अशातच सोशल मीडियावरही नवरा बायकोच्या भांडणाच्या घटना पहायला मिळतात. सोशल माध्यमांवर अनेक भांडणाचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात.

नुकताच इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे मुंबईच्या रस्त्यावर भांडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक वृद्ध महिला एका वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी स्टीलचे भांडे उचलत आहे. मात्र, तो माणूस त्याच्याकडून हे भांडी हिसकावून घेतो आणि तिला मारण्यासाठी उचलतो. महिलेने पुरुषाला मारहाण केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देते मगतो तिला मारत नाही. रस्त्यावर हा प्रकार सुरु असल्यामुळे आजुबाजुचे लोकही हा सर्व प्रकार पाहत होते.

त्यानंतर महिलेने अचानक बळजबरीने भांडी हिसकावण्याचा प्रयत्न केला. काही वापरकर्त्यांनी दावा केल्याप्रमाणे, ही घटना मुंबईतील मालाड पश्चिम येथील एमएम मितालीवालाजवळ घडली. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही पहायला मिळत आहे.

दरम्यान, नवरा बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही नवऱ्या बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये काही मजेशीर भांडणे असतात तर काही भांडणे गंभीर स्वरुपाची असतात.

First published:

Tags: Social media viral, Top trending, Video viral, Viral news