मराठी बातम्या /बातम्या /Viral /Live Video : दाम्पत्यामध्ये कडाक्याचं भांडण; पत्नीने महाकाय धबधब्यात मारली उडी

Live Video : दाम्पत्यामध्ये कडाक्याचं भांडण; पत्नीने महाकाय धबधब्यात मारली उडी

दाम्पत्य फिरायला गेले होते. तेथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पतीला वैतागलेल्या पत्नीने रागाच्या भरात सर्वांसमोर पुलावरुन पाण्यात उडी मारली

दाम्पत्य फिरायला गेले होते. तेथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पतीला वैतागलेल्या पत्नीने रागाच्या भरात सर्वांसमोर पुलावरुन पाण्यात उडी मारली

दाम्पत्य फिरायला गेले होते. तेथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पतीला वैतागलेल्या पत्नीने रागाच्या भरात सर्वांसमोर पुलावरुन पाण्यात उडी मारली

जबलपूर, 26 नोव्हेंबर : पती-पत्नीमधील (Husband and wife) वाद काही नवीन नाही. लग्नानंतर तर अशा प्रकारचा वाद सुरूच असतो. मात्र याच वादातून एक महिलेने आत्महत्या (Attempt Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) जबलपूर येथून समोर आला आहे. जबलपूर येथील धुवाधार धबधब्यावर दाम्पत्य फिरायला आले होते. येथे दोघांमध्ये वाद झाला आणि महिलेने महाकाय धबधब्यात उडी घेतली. महिला पाण्यात बुडत असतानाचा हा व्हिडीओ हैराण करणारा आहे.

हे दाम्पत्य कलकत्त्यातील असून तो पर्यटनासाठी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आले होते. त्यात पर्यटन स्थळावर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर 45 वर्षीय महिलेने वरुन पाण्यात उडी टाकली. बराच वेळ महिला पाण्यात होती. (Husband and wife conflict while walking The wife jumped into the river from the bridge)

" isDesktop="true" id="635573" >

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिला पाण्यात बुडताना दिसत आहे. सुदैवाना महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली नाही, अन्यथा तिला शोधणं कठीण झालं असतं. काही वेळातच स्थानिक गोताखोर महिलेला वाचविण्यासाठी पुढे आणले. त्यांनी महिलेला सुखरूप बाहेर काढले. आणि तिच्या कुटुंबीयांकडे सोपवलं.

पाण्यातून बाहेर काढल्यानंतर महिलेने पाय घसरल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांच्या समुपदेशात महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. नागरिकांनी आपल्य सदसदविवेक बुद्धीचा वापर करावा. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात.

हे ही वाचा-Video : ट्रकने 2 विद्यार्थ्यांना चिरडलं, पलटी झाल्यानंतरही लांबपर्यंत घसरत गेला

अशावेळी एखाद्या सुज्ञ माणसाशी याबाबत चर्चा करावी. समोर आलेला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. राज्य सरकारकडूनही अशा अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या असून ज्यात तुम्ही समुपदेशन मिळवू शकता. फोनच्या माध्यमातून संपर्क साधून आपला मानसिक ताण कमी केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Suicide attempt, Wife and husband