Home /News /viral /

भुकेलेल्या सापानं गिळली अख्खी चादर, पुढे काय झालं पाहा VIDEO

भुकेलेल्या सापानं गिळली अख्खी चादर, पुढे काय झालं पाहा VIDEO

हा व्हिडीओ खरंच अंगावर काटा आणणारा आहे. या सापाचे प्राण सर्पमित्रांनी मोठ्या मुश्किलीने वाचवले आहेत.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : सापाचे अनेक वेळा लढाईचे किंवा शिकार करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. जेव्हा सापाला खायला काहीच नाही मिळत आणि अशावेळी तो घरातल्या वस्तू गिळायला लागतो तेव्हा काय अवस्था होते हे सांगणारे दुर्मीळ व्हिडीओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी सापानं टॉवेल आणि प्लॅस्टिक गिळल्यामुळे काय झालं होतं याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सापानं अख्खी चादर भूक लागल्यामुळे गिळली. मात्र या चादरीचं पचन होऊ शकलं नाही. त्यामुळे सापाचं पोट फुगलं आणि त्याला त्रास होऊ लागला. या सर्पमित्रांनी या सापाच्या पोटातून चादर बाहेर काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे वाचा-VIDEO: सुसाट कारची जोरदार धडक आणि ट्रॅक्टरचे झाले तुकडे; थोडक्यात वाचला चालक हा व्हिडीओ खरंच अंगावर काटा आणणारा आहे. या सापाचे प्राण सर्पमित्रांनी मोठ्या मुश्किलीने वाचवले आहेत. सापाने चादर गिळल्यानंतर त्याचं पचन होत नव्हतं त्यामुळे त्याचं पोट फुगलं. सापाच्या तोंडातून ही चादर काढत्यात डॉक्टरांना यश आलं. त्यांनी या सापाचा जीव वाचवला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी सापाने टॉवेल गिळल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. सुदैवानं त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं होतं आता त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 32 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 603 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या