नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : हत्तीला (Elephant) भगवान गणेशाचं प्रतिक मानलं जातं. याच कारणामुळे हत्ती समोर दिसताच लोक प्रणाम करतात. हत्ती हा अतिशय विशाल प्राणी असला तरी त्याची सवारी करायला सर्वांनाच आवडतं. मात्र हत्ती जितका शांत असतो तितकाच कधीकधी चिडून घातकही बनतो. अशात एखाद्या भूकेल्या जंगली हत्तीनं तुमच्यावर हल्ला केला तर? नक्कीच हा क्षण सर्वांसाठीच भीतीदायक असेल. सध्या हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Elephant on Social Media) होत आहे. यात दिसतं की एक हत्ती आपली भूक भागवण्यासाठी फिमेल अॅनिमल लव्हरजवळ (Animal Lover) जातो. मात्र तिला काहीही नुकसान पोहोचवत नाही.
ही घटना तेव्हा घडली जेव्हा मोक्षा बायबे नावाची महिला आपल्या गार्डनमध्ये बसून चमच्याने कलिंगड खात होती. याच दरम्यान गार्डनमध्ये हत्तीची एण्ट्री झाली. हत्ती थेट मोक्षाजवळ येतो आणि तिच्या हातातील कलिंगड आपल्या सोंडेनं उचलून घेतो. रंजक बाब म्हणजे हा हत्ती अतिशय खास अंदाजात आणि सौम्यपणे मोक्षाच्या हातातून हे कलिंगड घेतो आणि ते खातो. यानंतर मोक्षा हसू लागते.
View this post on Instagram
मोक्षा मोगलीपेक्षा कमी नाही. तिची मैत्री केवळ हत्तीसोबतच नाही तर सिंह, अस्वल, चित्ता, लांडगा, माकड आणि मगर यासारख्या भयंकर प्राण्यांसोबतही आहे. ती सतत इन्स्टाग्रामवर जंगली प्राण्यांसोबतचे आपले नवनवीन व्हिडिओ शेअर करते. तिला भयंकर प्राण्यांसोबत खेळायला, जेवायला, अंघोळ करायला आणि रोमान्स करायला प्रचंड आवडतं.
नुकतंच तीन जगातील सर्वात मोठ्या मांजरीचा व्हिडिओदेखील शेअर केला होता. ही मांजर दिसताना एखाद्या भयंकर सिंहाप्रमाणे वाटते. मात्र प्रत्यक्षात ती एक मांजरच आहे. तुम्हीही या अनोख्या मांजरीकडे एकटक बघत राहाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.