लॉकडाऊनमध्ये खाण्याच्या शोधात चक्क झाडावर चढला हत्ती आणि...पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये खाण्याच्या शोधात चक्क झाडावर चढला हत्ती आणि...पाहा VIDEO

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी झाडावर चढणाऱ्या हत्तीचा दुर्मीळ व्हिडीओ असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : लॉकडाऊनदरम्यान जंगलात प्राण्यांच्या वेगवेगळ्या हालचालींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाली. काही व्हिडीओ गमतीशीर होते तर काही अजब तर काही भयंकर. असाच एक व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्वीट केला आहे. हत्तीचे रागात तोडफोड करताना, अंघोळ करताना, मस्ती करताना बरेच व्हिडीओ पाहिले पण खाण्याच्या शोधात चक्क हत्ती झाडावर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हत्तीला जेव्हा खूप भूक लागते तेव्हा ते खाण्यासाठी काहीही करू शकतात याचा प्रत्यय या व्हिडीओमधून येत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हत्ती दोन पाय या झाडावर ठेवून सोंडेनं झाडाच्या फांद्या खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे. खाण्यासाठी झाडावर चढण्याच्या प्रयत्नात हा हत्ती दिसत आहे.

सुशांत नंदा यांनी झाडावर चढणाऱ्या हत्तीचा दुर्मीळ व्हिडीओ असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओला 9 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे तर 1 हजार हून युझर्सनी लाइक 200 युझर्सनी रिट्वीट केलं आहे. झाडावर चढणाऱ्या या हत्तीचा दुर्मीळ असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-खळबळजनक, 3 वर्षांपूर्वी केले लेकावर अंत्यसंस्कार लॉकडाऊनमध्ये अचानक पोहचला घरी

हे वाचा-एक नाईट क्लब झाला हॉटस्पॉट, पार्टीला गेलेले 700 अधिक लोक निघाले कोरोना पॉझिटिव्ह

हे वाचा-VIDEO : थांबला तो संपला! या युवकाच्या जिद्दीसमोर हरण्याचं दु:खही विसरून जाल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 13, 2020, 10:51 PM IST

ताज्या बातम्या