व्हिडीओत पाहू शकत नवरी स्टेजवर नाही तर फूड काऊंटवर आहे. लग्न बाजूला ठेवून, स्टेज सोडून ती फू़ड काऊंटवर आली. बरं तिच्यासोबत दुसरं कुणी आहे तर तसंही नाही. ती एकटीच खायला आली. हे वाचा - गोलगप्पा खाने का स्ट्रगल तुम क्या जानो गे...! नाकात नथ घालून पाणीपुरी खाण्यासाठी नवरीची धडपड भुक्कडसारखी ती पाणीपुरी खाते आहे. सर्वांपासून लपूनछपून तिने पाणीपुरीवर ताव मारला. आपली ही चोरी पकडली जाणार नाही, असं तिला वाटलं असेल. पण तिची ही चोरी कॅमेऱ्यात कैद झाली. मग तिने शेवटची पाणीपुरी तोंडात भरली आणि तिथून गुपचूप काढता पाय घेतला. पुन्हा स्टेजवर आपल्या नवरदेवाजवळ गेली. आपल्याच लग्नात पाणीपुरीवर एकट्यानेच ताव मारणाऱ्या या भुक्कड नवरीबाईचा व्हिडीओ सर्वांना आवडला आहे. बॉलिवूड शादीज इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - VIDEO - आधी 'बर्गर किंग' नंतर लगीन! लग्न सोडून Burger खायला पोहोचली भुक्कड नवरी बरं आपल्याच लग्नात पाणीपुरीवर ताव मारणारी ही अशी एकमेव नवरी नाही. अशा बऱ्याच नवरी आहेत ज्या लग्नात अशा पद्धतीने पाणीपुरी खाताना दिसल्या. याआधीसुद्धा पाणीपुरी खाणाऱ्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही नवरी स्टेजवरच पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसली.View this post on Instagram
फुल ऑन मेकअप आणि नवरीबाईच्या वेशभूषेत सजलेली ही तरुणी लग्नसमारंभात गोलगप्पे खाताना दिसते. एका व्यक्तीनं आपल्या हातामध्ये गोलगप्पे असलेली प्लेट पकडली आहे, तर ही नवरीबाई यातून एक एक गोलगप्पा घेऊन खात आहे. आता तुमच्या डोक्यातही असा विचार आला असेल, की ही नवरीबाई तर गोलगप्पे खाण्यात मग्न आहे, मग नवरदेव नेमका कुठे आहे. हा व्हिडिओ शेअर करत दिलेल्या कॅप्शननुसार, नवरदेव यावेळी पुजा करण्यात व्यस्त होता. याच कारणामुळे संधीचा फायदा घेत नवरीबाई आपल्या आवडीच्या पदार्थाचा स्वाद घेण्यात मग्न झाली. हे वाचा - लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; कसे बकाबक खातायेत पाहा VIDEO इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Wedding Vows नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सर्वांनाच नवरीबाईचा हा अंदाज आवडत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding video