Home /News /viral /

थाळी पाहून भडकली भुकेली नवरी, जेवणासाठी भांड भांड भांडली; VIDEO VIRAL

थाळी पाहून भडकली भुकेली नवरी, जेवणासाठी भांड भांड भांडली; VIDEO VIRAL

आधीच पोटात कावळे ओरडत होते, त्यात जेवणाच्या थाळीत असं काही मिळालं की नवरी संतप्त झाली.

  मुंबई, 22 सप्टेंबर : बहुतेक लग्नामध्ये (Wedding Video) नवरा-नवरी (Bride Groom Video) लग्न लागेपर्यंत उपाशी असतात. काही खाल्लंच तर फळं खातात किंवा ज्युस वगैरे पितात. लग्न झाल्यानंतर पाहुणे जेवून गेल्यानंतर नवरा-नवरी आपल्या कुटुंबासोबत जेवतात. अशाच एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. जी चक्क लग्नात जेवणाच्या टेबलावर जेवणासाठी भांडू लागली (. लग्नातील विधीमुळे आधीच थकलेली त्यात दिवसभर पोटात हवं तसं काही न गेल्याने भुकेने तिच्या पोटात कावळे ओरडत होते. आता पोटभर दाबून जेवायचं या विचाराने ती जेवणाच्या टेबलावर बसली. पण तिच्यासमोर जेवणाच्या थाळीत असं काही आलं की ती भडकलीच. तिने सर्वांसमोर वेटरला झाप झाप झापलं.
  व्हिडीओत पाहू शकता नवरी खाण्यासाठी भांडताना दिसते आहे. ती वेटरला चांगलंच सुनावते आहेत. तिच्या चेहऱ्यावरून तिचा राग स्पष्ट दिसतो आहे. तिचा चेहरा पाहून आणि तिच्या एकंदर वागण्यावरून किती तरी वेळ तिला खायला मिळालं नाही आणि ती भुकली आहे हे दिसतं.  व्हिडीओ नीट ऐकला तर नवरीचा आवाजही ऐकू येतो. ती वेटरला विचारते, मेन्यूमध्ये आणखी दुसरं काही नाही आहे का? काहीच नाही आहे? चार प्लेट ब्राऊनी विथ आईसक्रिम खाऊ मी? काहीतरी दुसरं द्या ना. डाळ, भाजी, चपाती. इतके सारे पदार्थ आहेत. हे वाचा - सासूबाईने वाट लावली! लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली श्रिया भसीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांना नवरीची बाजू पटली आहे. याआधीसुद्धा लग्नात भडकलेल्या एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण ती नवरी जेवणावरून नाही तर आपल्या एंट्री साँगवरून भडकली होती.
  एंट्री घेताना तिने सांगितलेलं तिच्या आवडीचं गाणं न लावल्याने ती नाराज झाली आहे. व्हिडीओत तुम्ही ऐकाल तर नवरी बोलते मी बोलेल होते माझं गाणं लावला. मेरा पीया घर आया लावायला मी सांगितलं होतं.  लग्नाच्या खास दिवशी आपली जशी एंट्री ठरवली होती तशी झाली नाही, म्हणूनच नवरीचा चेहरा पडला. हे वाचा - नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीतच मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही नवरीसोबत असलेल्या तिच्या बहिणी, मैत्रिणी आणि इतर लोक तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. तू सांगितलेलंच गाणं लावणार असं सांगतात. पण नवरीचा मूड पूर्णपणे खराब झालेला दिसतो आहे. ती इतकी चिडली आहे की पुढे जायलाच तयार नाही.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या