Home /News /viral /

जीवघेणं गाणं, ऐकून लोक करायचे आत्महत्या; काय होतं त्या गाण्यात पाहा VIDEO

जीवघेणं गाणं, ऐकून लोक करायचे आत्महत्या; काय होतं त्या गाण्यात पाहा VIDEO

जगातील सर्वात सॅड साँग म्हणून हे गाणं ओळखलं जाऊ लागलं आणि त्यावर तब्बल 62 वर्षे बॅनही होता.

    हंगेरी, 20 ऑगस्ट : आपण कितीही तणावात असलो तरी गाणं (song) ऐकल्यानंतर मनावरील ताण हलका होतो. त्यामुळे आपल्याला कसलं टेन्शन आलं की आपण आपलं आवडतं गाणं ऐकतो. आनंदी असलो की हॅप्पी साँग, प्रेमात असलो की रोमँटिक साँग, प्रेमभंग झाल्यावर ब्रेकअप साँग आपण ऐकतो. मात्र सुसाइड साँग (suicide song) बाबत कधी ऐकलं आहे का? हे गाणं ऐकून अनेक जण आत्महत्या करायचे असं सांगितलं जातं. या गाण्याची दहशत इतकी होती की तब्बल 62 वर्षे या गाण्यावर बंदी होती. हंगेरीतील संगीतकार रेजसो सेरेज यांनी 1933 साली सॅड संडे किंवा ग्लुमी संडे (gloomy sunday) हे गाणं रचलं. हे गाणं प्रेमाशी संबंधित होतं आणि या गाणं इतकं काळजाला भिडणारं होतं की ऐकणाऱ्या आपल्या वेदना आठवायच्या. त्यानंतर हे गाणं ऐकून कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर आत्महत्या रोखण्यासाठी हे गाणं पुन्हा कंपोझ करण्यात आलं. मात्र तरीही लोकांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी झालं नाही. त्यामुळे 1941 हे गाणं बॅन करण्यात आलं. 2003 साली त्यावरील बंदी उठवण्यात आली. या गाण्याला हंगेरीअन सुसाइड साँग म्हणूनही ओळखलं जातं. हे गाणं आजही युट्युबर आहे. मात्र आता हे गाणं ऐकल्यानंतर लोकांना प्रश्न पडला की या गाण्यात असं काय होतं, जे ऐकून लोक आत्महत्या करायचे. हे वाचा - झूमवर पालिकेची मीटिंग सुरू असताना कॅमेरा राहिला ऑन, SEX करताना दिसलं कपल आणि... सेरेज यांनी आपल्या प्रेमभंगातून हे गाणं लिहिल्याचं सांगितलं जातं.  आयुष्यात आपली ओळख बनवण्यात संघर्ष करणारे सेरेज यांना यश मिळालं नाही. रेजसो एक पिआनोही वाजवायचे आणि त्यात त्यांना करिअर करायचं होतं. मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही म्हणून त्यांच्या प्रेमिकाने त्यांची साथ सोडली होती. प्रेमात धोका मिळाल्याने सेरेस यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आपल्या प्रेमिकाच्या आठवणीत त्यांनी गाणं लिहिलं आणि त्याला ग्लुमी संडे असं नाव दिलं. त्यानंतर हे गाणं खूप प्रसिद्ध झालं, मात्र हेच गाणं मृत्यूसाठीही कारणीभूत ठरू लागलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Suicide, Viral videos

    पुढील बातम्या