Elec-widget

माशाला माणसासारखा चेहरा? VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का

माशाला माणसासारखा चेहरा? VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का

तुम्ही कधी माशाला माणसासारखा चेहरा असल्याचे पाहिले आहे? नाही ना.

  • Share this:

बिजींग, 12 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सतत कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण तुम्ही कधी माशाला माणसासारखा चेहरा असल्याचे पाहिले आहे? नाही ना. मात्र सध्या चीनमधल्या एका नदीमध्ये असा प्रकार घडला आहे. या माशाचा व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

चीनमधल्या एका गावात एका माशाचा चेहरा हुबेहुब माणसासारखा दिसत आहे (‘Human-Like' Face Fish). या व्हिडीओमध्ये या माशाचा चेहरा खरच एका पुरुषासारखा दिसत आहे. 14 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हा मासा नदीमध्ये पोहताना दिसत आहे. हा मासा काहीतरी खाण्याचा प्रयत्न करत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या माशाला माणसाप्रमाणे नाक, दोन डोळे आणि माणसा सारखा चेहरा आहे.

वाचा-चड्डी घालून नवा मोगली करतोय सचिनसारखी तुफानी बॅटिंग! पाहा VIRAL VIDEO

डेली मेल या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ पर्यटणासाठी गेलेल्या एका महिलेनं रेकॉर्ड केला आहे. चीनच्या मियाओ गावातील एक नदीमध्ये हा मासा प्रामुख्यानं आढळला जातो. हा व्हिडीओ चायनाच्या मायक्रोब्लॉगिंग साइट वीबो आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा-‘किती बेशरम आहेस यार तू’, दीपक चाहरनं रेकॉर्ड मोडल्यावर भडकला चहल!

वाचा-जगातभारी! चक्क बॉसनं धुतले कर्माचाऱ्यांचे पाय, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 5 लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला 17 हजार लाईक्स आणि 5 हजार रि-ट्वीट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 08:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...