Home /News /viral /

स्विमिंग पूल दिसल्यावर कुत्रा आला जोमात, करामत पाहून नेटकरी कोमात! पाहा Video

स्विमिंग पूल दिसल्यावर कुत्रा आला जोमात, करामत पाहून नेटकरी कोमात! पाहा Video

या माणसाला त्यांच्या पाळीव कुत्र्यासाठी एक तलाव मिळाला आणि त्याला वाटले की त्यात पोहायला आवडेल. पण तलावातील पाण्याचे पुढे काय केले ते पाहून तुम्ही मोठ्याने हसाल.

    नवी दिल्ली, 27 जून : सोशल मीडियावर (Social Media) पाळीव प्राण्यांच्या (Pets) करामती, गमतीजमती असलेले अनेक व्हिडिओ आणि फोटोज रोज शेअर केले जातात. असे व्हिडिओज आणि फोटोजना नेटिझन्सकडून (Netizens) चांगली पसंती मिळते. इन्स्टाग्रामसारख्या (Instagram) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रामुख्यानं पाळीव कुत्रे (Dog) किंवा मांजरांचे (Cat) मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होतात. इन्स्टाग्रामवर काही अकाउंट्स खास कुत्रे किंवा मांजरांनाच वाहिलेली आहेत. या अकाउंट्सवरून कुत्र्यांचे विविध पेहरावातले फोटो, मालकासोबत केलेल्या करामतीचे व्हिडिओज, फोटोज शेअर केले जातात. सध्या इन्स्टाग्रामवर कुत्र्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओतल्या कुत्र्यानं केलेली कृती अनपेक्षित आहे, असं नेटिझन्सना वाटतं. या व्हिडिओला आतापर्यंत 2.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले असून, त्यावर अनेक जणांनी कमेंट्सही (Comments) केल्या आहेत. `हिंदुस्थान टाइम्स`ने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एका पाळीव कुत्र्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खास कुत्र्यासंदर्भातल्या विषयाला समर्पित असलेल्या ऑरोरा नावाच्या (Aurora) इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या पाळीव कुत्र्याच्या खास पेजचे सुमारे 600 फॉलोअर्स आहेत. हा व्हिडिओ 18 जूनला शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत त्याला 2.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. Shocking! भीषण अपघातानंतर उठून नाचू लागली व्यक्ती; VIDEO पाहून चक्रावून जाल या व्हिडिओत सुरुवातीला एक किडी स्विमिंग पूल (Kiddie Swimming Pool) अर्थात लहान मुलांचा पोहण्याचा तलाव दिसतो. आपल्या कुत्र्यानं पोहोण्याचा यथेच्छ आनंद घ्यावा, यासाठी मालक त्या पूलमध्ये पाणी सोडत आहे. पाळीव कुत्रा या पूलच्या शेजारी उभा आहे. या पूलमध्ये एका रबरी नळीतून पाणी सोडण्यात येत आहे. हा पाळीव कुत्रा या पूलमध्ये उतरून पोहण्याचा आनंद घेईल, असं प्रथमदर्शनी दर्शकांना वाटू शकतं. परंतु, व्हिडिओ जसजसा पुढे जातो, तसतसं लक्षात येतं की जे घडतंय ते निराळंच आहे. पाळीव कुत्रा या किडी पूलजवळ काही क्षण घुटमळतो. त्यानंतर कुत्र्याला तो पूल नसून पाण्याचं एक मोठं भांडं आहे, असं वाटतं. त्यामुळे हा कुत्रा या पूलमध्ये पोहायला उतरण्याऐवजी, त्यातलं पाणी पिऊ लागल्याचं व्हिडिओत दिसतं. पाळीव कुत्र्याचा हा व्हिडिओ शेअर करताना, त्याला `पाण्याचा मेगा पॉइंट` अशी कॅप्शन देण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवरच्या या पाळीव कुत्र्याच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. यापैकी एक युझर कमेंट करताना म्हणतो, की `या कुत्र्याची ही कृती पाहून मला अक्षरशः रडू आलं.` `त्यानं हायड्रेटेड राहावं,` असं दुसरा युझर कमेंटमध्ये म्हणतो. तिसरा युझर म्हणतो, की `हा माझ्या कुत्र्याप्रमाणेच आहे. तो सर्वांत उष्ण दिवस असू शकतो. त्यामुळे हा कुत्रा त्याची आवडती रबरी नळी पाहून पूलमधलं पाणी पीत आहे.`
    First published:

    Tags: Dog, Social media

    पुढील बातम्या