Home /News /viral /

युरोपात चक्क झाडांवर उगवतो कान? जगभरातील पर्यटकांकडून आश्चर्य व्यक्त

युरोपात चक्क झाडांवर उगवतो कान? जगभरातील पर्यटकांकडून आश्चर्य व्यक्त

माणसांचे कान कधी झाडांवर उगवलेले पाहिले आहेत का? खरोखरच अशा प्रकारचे अनोखे कान युरोपातल्या झाडांवर पाहायला मिळताहेत.

    मुंबई, 30 जून : माणसांचे कान कधी झाडांवर उगवलेले पाहिले आहेत का? खरोखरच अशा प्रकारचे अनोखे कान युरोपातल्या झाडांवर पाहायला मिळताहेत. पर्यटकही ही गोष्ट पाहून आश्चर्य व्यक्त करताहेत. कानासारख्या दिसणाऱ्या या गोष्टीमागचं रहस्य काय आहे हे जाणून घेतलं असता, ती कानासारखी दिसणारी बुरशी (Fungus) असल्याचं समोर आलं आहे. याबाबतचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. या फोटोमध्ये दिसणारा कान झाडावर लटकतो आहे. खरं तर ही एक प्रकारची बुरशी आहे. काही जण याला मानवी कानाचा मशरूम (Human Ear Shaped Fungus) असं म्हणतात, तर याचं सामान्य नाव जेली इअर (Jelly Ear) असं आहे. Auricularia auricula-judae असं याचं शास्त्रीय नाव आहे. 19व्या आणि 20 व्या शतकात याचा उपयोग औषध म्हणूनही केला जात होता. संपूर्ण युरोपमध्ये झाडावर ही बुरशी उगवते. जेली इअर (Jelly Ear) 3.5 इंच लांब आणि 3 मिमी जाड असून कानाच्या आकाराची असते. कधीकधी तिला कपाचा आकारही येतो. याचं वरचं आवरण लाल-करड्या रंगाचं असतं. कधीकधी जांभळा रंगही दिसतो. ही बुरशी बिलबिलीत असते. तिच्यावर सुरकुत्या असतात. हळूहळू या बुरशीचा रंग गडद होत जातो. ही बुरशी खासकरून औदुंबराच्या झाडावर उगवते. (जायफळचा रक्तरंजित इतिहास, युद्धात अनेक शेतकरी मारले गेले) या बुरशीचा वापर औषधात केला जात असला, तरी ती खाल्ली जाऊ शकते का याबाबत मतमतांतरं आहेत. ही बुरशी खाता येणार नाही, असं एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमध्ये मानलं जात होतं; मात्र पोलंडमधले नागरिक हे खात होते. कच्ची जेली इअर खाता येत नाही. जेली इअर खाण्यालायक व्हावी, यासाठी ती शिजवली जाते. ती वाळवल्यानंतर त्यातून भरपूर पोषणमूल्यं मिळतात. 100 ग्रॅम जेली इअरमध्ये 370 कॅलरीज असतात. यात 10.6 ग्रॅम प्रोटीन, 0.2 ग्रॅम फॅट्स, 65 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 0.03 मिलीग्रॅम कॅरोटीन असतं. जेली इअरमध्ये 90 टक्के पाण्याचा अंश असतो. जेली इअरचा उपयोग औषधामध्ये केला (Used As Medicines) जात होता. घशातली खवखव, डोळ्यांचं दुखणं, कावीळ या समस्यांवर तिचा उपयोग होत होता. इंडोनेशियात 1930च्या दशकात औषध म्हणून या बुरशीच्या वापराला सुरुवात झाली. युरोपमध्ये संपूर्ण वर्षभर ही बुरशी उगवते. रुंद पानं असलेल्या झाडांच्या खोडांवर, फांद्यांवर ही बुरशी उगवते. सगळ्यात आधी चीन आणि पूर्व आशियातल्या देशांमध्ये याची शेती केली जाते. त्यानंतर ही बुरशी युरोपात पोहोचली. विशेष म्हणजे ही बुरशी कोणत्याही ऋतूनुसार स्वतःला बदलू शकते. स्वतःच्या डीएनएमध्येही बदल करते.
    First published:

    पुढील बातम्या