मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिला नागा साधूही राहतात निर्वस्त्र? फक्त याच वेळी देतात जगाला दर्शन!

महिला नागा साधूही राहतात निर्वस्त्र? फक्त याच वेळी देतात जगाला दर्शन!

 हिंदू धर्मात संत आणि साधूंची मोठी परंपरा आहे. साधूंच्या या परंपरेत काही पुरुष नागा साधूही असतात. कुंभमेळा असला की नागा साधूंची सर्वत्र चर्चा होते; मात्र नागा साधूंमध्ये केवळ पुरुषच नसतात, तर स्त्रियाही नागा साधू असतात.

हिंदू धर्मात संत आणि साधूंची मोठी परंपरा आहे. साधूंच्या या परंपरेत काही पुरुष नागा साधूही असतात. कुंभमेळा असला की नागा साधूंची सर्वत्र चर्चा होते; मात्र नागा साधूंमध्ये केवळ पुरुषच नसतात, तर स्त्रियाही नागा साधू असतात.

हिंदू धर्मात संत आणि साधूंची मोठी परंपरा आहे. साधूंच्या या परंपरेत काही पुरुष नागा साधूही असतात. कुंभमेळा असला की नागा साधूंची सर्वत्र चर्चा होते; मात्र नागा साधूंमध्ये केवळ पुरुषच नसतात, तर स्त्रियाही नागा साधू असतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 8 फेब्रुवारी : हिंदू धर्मात संत आणि साधूंची मोठी परंपरा आहे. साधूंच्या या परंपरेत काही पुरुष नागा साधूही असतात. कुंभमेळा असला की नागा साधूंची सर्वत्र चर्चा होते; मात्र नागा साधूंमध्ये केवळ पुरुषच नसतात, तर स्त्रियाही नागा साधू असतात याची फारच थोड्या लोकांना माहिती असेल. या महिला नागा साधू फारशा दिसत नाहीत. काही खास दिवशीच त्या लोकांसमोर येतात. या महिला नागा साधूंबाबत माहिती घेऊ या.

  नागा साधू म्हटलं की त्यांच्या जटा, भस्म लावलेलं निर्वस्त्र शरीर आणि चेहऱ्यावरचे भाव डोळ्यांसमोर येतात. सहसा केवळ कुंभमेळ्यांसारख्या खास सोहळ्यामध्येच अशा साधूंचं दर्शन होतं. हिंदू धर्मात या नागा साधूंना विशेष महत्त्व आहे. कारण खूप कठीण तपश्चर्या करून त्यांना नागा साधू म्हणून पदवी मिळालेली असते. त्यांचे नियमही खूप कडक असतात. नागा साधूंमध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलाही असतात.

  कशा असतात महिला नागा साधू?

  पुरुष नागा साधूंप्रमाणे महिला नागा साधू विवस्त्र नसतात. त्या गेरूच्या रंगाचं एक शिवलेलं वस्त्र परिधान करतात. पुरुषांप्रमाणे त्यांच्याही जटा असतात, भस्मही त्या लावतात. कपाळावर टिळा लावतात. मात्र त्या निर्वस्त्र राहत नाहीत. त्या वस्त्र परिधान करतात, पण त्यांना केवळ एकच वस्त्र घालण्याची मुभा असते. त्याला गंती असं म्हणतात. आश्रमातल्या इतर साध्वी महिला नागा साधूंना माता असं संबोधतात.

  नागा साधूंचं जीवन खूप कष्टाचं असतं. त्यांना कठोर तपस्या करूनच ते पद मिळतं. लांब वाढलेल्या जटा, भस्मविलेपित अंग आणि हातात काठी घेऊन फिरणारे नागा साधू बनणं वाटतं तेवढं सोपं नाही. महिला नागा साधूंसाठीही ही प्रक्रिया खूप कठीण असते. त्या अनेक वर्षं जंगलात, डोंगरांमध्ये राहून तपश्चर्या करतात. जिवंतपणीच स्वतःचं पिंडदान करतात, केशवपन करतात. सर्वसामान्य आयुष्यात मिळणाऱ्या अनेक गोष्टींचा त्याग करूनच त्यांना गुरूंकडून महिला नागा साधूची उपाधी मिळते.

  महिला नागा साधू कधी समोर येतात?

  महिला नागा साधू सर्वसामान्य माणसांपासून खूप लांब जाऊन राहतात. परमेश्वराची भक्ती करणं हाच त्यांचा उद्देश असतो. त्यामुळेच कुंभ किंवा महाकुंभ सोहळ्यावेळी नदीच्या पवित्र जलामध्ये स्नान करण्यासाठी त्या सर्वसामान्य नागरिकांच्या समोर येतात.

  नागा साधूंबाबत समाजाला खूप आकर्षण आहे. पुरुष आणि महिला नागा साधूंच्या दिसण्यात फारसा फरक नसतो. तसंच त्यांना इतर नागा साधूंप्रमाणेच कठोर तपश्चर्याही करावी लागते.

  First published: