मुंबई 28 मे: मधमाशा (Honey Bee) फॅन्टा (Fanta) हे कोल्ड ड्रिंक पितात असं सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हे खरं असल्याचं सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यात चक्क दोन मधमाशा फॅन्टाच्या बाटलीचे झाकण (Lid of Fanta Bottle) उघडताना दिसत आहेत. इतके दिवस माणूस मधमाश्यांच्या पोळ्यांवर (Bee Hives) हल्ला करून मध (Honey) काढून घेत होता; पण आता बदलत्या काळात मधमाशाही माणसाच्या गोष्टी चोरत आहेत, अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर व्यक्त होत आहे.
अतिशय आश्चर्यकारक असा हा व्हिडिओ ट्विटर आणि यू ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. शेअर केल्यापासून त्याला आतापर्यंत तब्बल दहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, युट्यूबवरही त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ब्राझीलच्या (Brazil) साओ पाओलोमधील (São Paulo) कारगुआटुआटुबा (Caraguatatuba) इथं एका महिलेनं हा व्हिडिओ शूट केला आहे.
यामध्ये दोन मधमाश्या फॅन्टा या कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. एक मधमाशी झाकणाच्या एका बाजूला तर एक मधमाशी झाकणाच्या दुसऱ्या बाजूला आहे. दोघी मिळून झाकण बरोबर घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं फिरवत असून, काही प्रयत्नानंतर त्यांनी ते झाकण यशस्वीरित्या उघडलेलं दिसत आहे. हा व्हिडिओ शूट करणारी महिला पोर्तुगीज भाषेत बोलताना दिसत आहे. आपला फॅन्टा चोरण्यासाठी या मधमाशांनी चांगली टीम बनवली आहे,असं तिनं म्हटलं आहे.
Wrong side ने सायकल चालवली म्हणून महिला पोलिसाने अडवलं, आणि... थेट कोर्टात झाली रवानगी
Well, that's it for humanity. We've had a decent run but if bees have mastered the screw-top lid I think this is the beginning of the end. pic.twitter.com/XyHonJ2q73
— Michael Moran (@TheMichaelMoran) May 25, 2021
जिराफला पानं खाऊ घालत होता मुलगा, अचानक हवेतच उडाला; पाहा Shocking Video
या मजेदार व्हिडिओवर लोकांनी उस्फूर्त प्रतिक्रिया दिल्या असून, एका ट्विटर युजरनं लिहिलं आहे की, ‘मधमाश्यांनी बाटलीचं झाकण उघडलं ही मानवतेच्या (Humanity) दृष्टीकोनातून केलेली कृती होती.’ ‘मधमाशा कात्री वापरण्याची कला शिकल्या तर मात्र माणसासाठी काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल,’ अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. तर या मधमाशा ते झाकण उघडताना एकमेकींना कशा सूचना देत असतील याचं एक काल्पनिक संभाषण एका युजरनं लिहिलं आहे.
एका युजरनं म्हटलं आहे की, आता फॅन्टामध्ये (Fanta) मधमाशांना कामावर ठेवायला हरकत नाही. 2017मध्ये केलेल्या एका प्रयोगात बक्षीसाच्या आशेनं मधमाशा शिकतात आणि इतर मधमाशांनाही शिकवतात, हे सिद्ध झालं आहे. या प्रयोगात वैज्ञानिकांनी मधमाशांना एक बॉल (Ball) एका जागेच्या टोकावरून मध्यभागी आणण्याचे प्रशिक्षण दिले होते. हे काम पूर्ण केल्यावर त्यांना साखरपाणी (Sugar Water) देण्यात आलं. त्यानंतर प्रशिक्षित मधमाशांनी हे काम कसे करायचे ते कामकरी मधमाशांना दाखवले तेव्हा त्यांनी ते काम अधिक चांगल्या पद्धतीनं केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Video viral