Home /News /viral /

सासरी कसं वागायचं? होणाऱ्या सासुने सूनेच्या हातात दिली नियमांची लिस्ट, होतेय Viral

सासरी कसं वागायचं? होणाऱ्या सासुने सूनेच्या हातात दिली नियमांची लिस्ट, होतेय Viral

होणाऱ्या सासूने दिलेली ही अटी-नियमांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    लंडन, 31 मे: चुकीचं असलं तरी (Marriage) अनेकदा लग्नांमध्ये नियम-अटी घातल्या जातात. मुलगा आणि मुलीकडे वेगवेगळे नियम असतात. इच्छा नसताता दोन्ही पक्षांना ते पूर्ण करावं लागतं. सोशल मीडियावर (Social Media) अशी एक नियमांची लिस्ट व्हायरल होत आहे. जी वाचून तुम्हालाही घाम येईल. एका TikTok यूजरने आपल्या बॉयफ्रेंडच्या आईची भेट घेतली. आणि ही यादी शेअर केली. या लिस्टवर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. अटी मानाव्याच लागतील ‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, Tiktok यूजर एमा (Emma) नी आपल्या अकाऊंटवरुन एक लिस्ट शेअर केली आहे. ज्यात तिच्या बॉयफ्रेंडच्या आईने (Boyfriend) काही नियमांचा उल्लेख केला आहे. या लिस्टमध्ये मुलाच्या आईने लिहिलं आहे की, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुलीसाठी त्यांच्या मुलाच्या आयुष्यात जागा नाही. म्हणजेच ज्या मुलीला माझ्या मुलासोबत आयुष्य व्यतीत करावयाचं आहे, तिला नियमांचं पालन करावं लागेल. हे ही वाचा-VIDEO:लहान मुलांना इतकं काम असतं का?ऑनलाईन क्लासबद्दल चिमुकलीची थेट PMकडे तक्रार अशी आहे ही लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या लिस्टमध्ये काय आहेत नियम 1 माझ्या मुलाला ATM समजू नये 2 जर मुलगी माझ्या घरी कोणत्याही स्ट्रिपरवर येते, तर तिला बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. (विचार करुन कपडे घालावे) 3 हे समजून घ्यावं की जर मला तू आवडली नाही, तर तुला जावं लागेल 4 जोपर्यंत तुझ्या बोटांमध्ये त्याची अंगठी नाही, तोपर्यंत तुझा सल्ला ग्राह्य धरला जाणार नाही आदी 5 मुलीच्या मोबाइलमध्ये सेक्सी कंटेन्ट सापडला तर नातं संपलं म्हणून समजा 6 तू त्याची इन्चार्ज नाही, त्यामुळे तू त्याला बदलवण्याचा प्रयत्न करू नकोस, याची गरज नाही. इतकचं नाही तर मुलाच्या आईने पुढे लिहिलं आहे की, मला जेल जाण्यापासून कसं रोखता येईल हे मला माहीत आहे. विचित्र अटींची ही यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोकांनी या लिस्टवर निराशा व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या अटी लागणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया येत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mother, Photo viral

    पुढील बातम्या