मराठी बातम्या /बातम्या /Viral /

MMS किंवा खाजगी व्हिडीओ कसे लीक होतात, याला आपण थांबवू शकतो? प्रत्येक मोबाईल युजर्सला माहित असाव्यात 'या' गोष्टी

MMS किंवा खाजगी व्हिडीओ कसे लीक होतात, याला आपण थांबवू शकतो? प्रत्येक मोबाईल युजर्सला माहित असाव्यात 'या' गोष्टी

तुम्ही बऱ्याचदा फोटो किंवा व्हिडीओ लीक झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण हे असं का होतं? कशामुळे होतं, याला आपण टाळू शकतो का? असा तुम्हाला प्रश्न पडलाय?

तुम्ही बऱ्याचदा फोटो किंवा व्हिडीओ लीक झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण हे असं का होतं? कशामुळे होतं, याला आपण टाळू शकतो का? असा तुम्हाला प्रश्न पडलाय?

तुम्ही बऱ्याचदा फोटो किंवा व्हिडीओ लीक झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण हे असं का होतं? कशामुळे होतं, याला आपण टाळू शकतो का? असा तुम्हाला प्रश्न पडलाय?

  • Published by:  Devika Shinde
मुंबई 20 सप्टेंबर : स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तो आपल्या जिवनातल्या दररोजच्या कामातली अगदी लहान मोठं सगळं काम करतो. म्हणजे फोन करण्यापासून ते फोटो काढणे आणि पैसे पाठवण्यापर्यंत सगळ्याच कामासाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. परंतू हाच स्मार्टफोन कधीकधी आपल्यासाठी धोकादायक देखील ठरतो. तुम्ही बऱ्याचदा फोटो किंवा व्हिडीओ लीक झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण हे असं का होतं? कशामुळे होतं, याला आपण टाळू शकतो का? असा तुम्हाला प्रश्न पडलाय? खरंतर आपणच आपल्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे अगदी खाजगी गोष्टी देखील फोनमध्ये ठेवतो. परंतू त्यामुळेच आपल्याला नुकसान सहन करावं लागतंय. अशीच एक घटना नुकतीच मोहालीतील एका खाजगी विद्यापीठातून उघडकीस आली, जिथे एका विद्यार्थ्याने तिच्यासोबत राहणाऱ्या मुलींच्या व्हिडीओ क्लिप रेकॉर्ड केल्या आणि त्या तिच्या प्रियकराला पाठवल्या. विद्यार्थिनींचे व्हिडीओ लीक झाल्यानंतर त्याची देशभरात चर्चा होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. परंतू हे खासगी व्हिडीओ किंवा एमएमएस लीक कसे होतात हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे, चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. हे वाचा : Zoom वर मीटिंग करत असाल तर... सरकारने दिला इशारा, लगेच करा हे काम! 1. जुना फोन विकल्यावर होऊ शकतो डेटा लीक अनेक वेळा आपण आपला जुना फोन कोणाला तरी विकतो. परंतू फोन विकताना बरेच लोक त्यांचा डेटा हटवत नाहीत किंवा फोन रीसेट करत नाही. अशावेळी त्यांचा डेटा, व्हिडिओ आणि फोटो हे सगळं फोन विकत घेतलेल्या व्यक्तीकडे जातात. अशा परिस्थितीत खाजगी व्हिडीओ आणि फोटो लीक होऊ शकतात. 2. अ‍ॅप्समधून व्हिडीओ होतात लीक गुगलवर असे अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कॅशबॅक किंवा इतर ऑफर्स दिल्या जातात. ज्याच्या लोभामुळे अनेकदा वापरकर्ते हे अ‍ॅप्स त्यांच्या फोनमध्ये डाउनलोड करतात. इतकेच नाही तर यूजर्स त्या अ‍ॅप्सची माहित न वाचता त्याला आपल्या फोनचा अ‍ॅक्सेस देतात. अशा प्रकारे आपण स्वत:च या फर्जी अ‍ॅप्सना आपली माहिती चोरण्याची संधी देतो. त्यामुळे यापासून पुढे कोणत्याही अ‍ॅपला गॅलरीत प्रवेश देण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगा. 3. क्लाउडमधून डेटा लीक होऊ शकतो बरेचदा आपण जीमेल आणि ड्रॉपबॉक्स सारख्या क्लाउडवर महत्वाचे दस्तऐवज, व्हिडीओ आणि फोटो सेव्ह करतो. बहुतेक व्हिडीओ येथून लीक होतात. तसेच अनेक वेळा आपण सहज लक्षात ठेवता यावे म्हणून सोपे पासवर्ड ठेवतो, परंतु असे पासवर्ड सहज हॅक होऊ शकतात. काहीवेळा लोक आपला पासवर्ड इतर कोणाशी तरी शेअर करतो, ज्यामुळे डेटा लीक होण्याचा धोका वाढतो. हे वाचा : प्रवासादरम्यान असं काय घडलं की एका बापावर आली मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून देण्याची वेळ, वाचा आता प्रश्न असा उभा राहातो की. डेटा चोरीला जात आहे की नाही हे कसे ओळखावं? जेव्हा कोणी तुमच्या मोबाईलमधून डेटा चोरतो, तेव्हा तुमच्या मोबाईलमधील डेटा लवकर संपतो. या शिवाय तुमची बॅटरी झपाट्याने संपते. यासोबतच तुमचा फोनही स्लो होतो आणि तुमचा फ्रंट कॅमेरा आपोआप पुन्हा पुन्हा चालू होतो. याशिवाय, काही वेळा तुमचा फोन उशिराने प्रतिसाद देऊ लागतो किंवा स्लो होतो. तुमच्यासोबत देखील असंच काहीसं घडत असेल, तर लगेच सावध व्हा. डेटा चोरीला जात असेल तर बचाव कसा करायचा? गुगलवरून कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करताना त्याबद्दल नीट वाचा. तसेच, कोणत्याही अ‍ॅपला गॅलरीत प्रवेश देण्यापूर्वी काळजी घ्या. याशिवाय, तुमचा फोन विकताना, हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्याला फोन विकत आहात त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल जास्त माहिती नसावी, तसेच तुमचा फोन फॉरमॅट केलेला असाव. यासाठी, प्रथम तुमचा आवश्यक डेटा नवीन फोनमध्ये हस्तांतरित करा, त्यानंतर जुना फोन रीसेट करा. तसेच, जीमेल आणि ड्रॉपबॉक्स सारख्या क्लाउडवर डेटा सेव्ह करणे टाळा. याशिवाय फोनचा पासवर्डही कुणाला सांगू नये.
First published:

Tags: Shocking viral video, Social media, Top trending, Viral news

पुढील बातम्या