मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'ही तर करोडपती गरीब महिला...' पैसे वाचवण्याच्या ट्रीक ऐकून तुम्ही हेच म्हणाल

'ही तर करोडपती गरीब महिला...' पैसे वाचवण्याच्या ट्रीक ऐकून तुम्ही हेच म्हणाल

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 25 जानेवारी : श्रीमंत व्यक्ती भरपूर पैसे खर्च करतात, असा एक सर्वसामान्य समज असतो. बऱ्याचदा तसं असतंही. मात्र काही श्रीमंत व्यक्ती कोट्यधीश असूनही पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. 43 कोटी रुपयांची संपत्ती असणारी रिअल इस्टेट इन्व्हेस्टर अ‍ॅमी एलिझाबेथ पैशांच्या बाबतीत खूपच कंजूष आहे. करोडपती असूनही ती महिन्याला एका ठरावीक मर्यादेपलीकडे खर्च करत नाही. तिच्या पैसे वाचवण्याच्या स्वभावाबद्दल तिने एका टीव्ही शोमध्ये सांगितलं होतं. तिच्या या स्वभावाची परिसीमा म्हणजे पैसे वाचवण्यासाठी तिने एकदा चक्क मांजराचं खाद्यही खाल्लं होतं.

पैसे वाचवले, तर पैशांचा अपव्यय टळतो, असं वाटणाऱ्यांपैकी अ‍ॅमी एक आहे. 51 वर्षांची अ‍ॅमी एलिझाबेथ खरं तर करोडपती आहे. अमेरिकेतल्या लास वेगासमध्ये ती राहते. तिच्याकडे 43 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

हे ही पाहा : आवडीने समोसा खाताय? हा Video पाहून पुन्हा कधीही खाण्याचा विचार करणार नाही

इतके पैसे असूनही ती पैसे खर्च करण्याच्या बाबतीत अगदीच कठोर आहे. तिनं स्वतःसाठी महिन्याचं बजेट तयार केलंय. त्यात तिनं स्वतःसाठी 80 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केलीय. हे केवळ सांगण्यासाठी नाही, तर अ‍ॅमी या बजेटचं तंतोतंत पालन करते. तिला जास्त खर्च करायला आवडत नाही. इतकंच नाही, तर तिनं पैसे वाचवण्यासाठीच्या नवनवीन युक्त्या शोधल्या आहेत.

अ‍ॅमी तिच्या घरातला पाण्याचा हीटर जास्त वेळ चालू ठेवत नाही. इतरही विजेवरची उपकरणं काम झाल्यावर लगेच बंद करते. यामुळे दर महिन्याला विजेच्या बिलात थोडी कपात होते. अ‍ॅमी सध्या राहते ते घर तिच्या आधीच्या नवऱ्याचं आहे. त्यामुळे त्या घराची स्वच्छता व इतर देखभाल तिचा आधीचा नवराच करतो. त्यामुळे त्या खर्चाचा बोजा तिच्यावर पडत नाही.

अ‍ॅमी पैसे वाचवण्यासाठी कोणत्याही उपायांचा अवलंब करू शकते. तसं तिनेच एका टीव्ही शोमध्ये सांगितलं होतं. एकदा पैसे वाचवण्यासाठी तिने तिच्या मांजराचं खाद्यही खाल्लं होतं. इतकंच नाही, तर घरी आलेल्या पाहुण्यांनाही ते खायला दिलं होतं. पैसे वाचवण्यासाठी अ‍ॅमी डबाबंद खाद्यपदार्थ घेत नाही. त्याउलट ती सुटे पदार्थ विकत घेते. त्यामुळे तिचे बरेच पैसे वाचतात.

हे ही पाहा : वेगळ्या पद्धतीची चहा पिण्याच्या नादात असा फसला तरुण, आता स्वप्नात सुद्धा थरथर कापेल, पाहा Video

डेली स्टारच्या वृत्तानुसार, अ‍ॅमी एक लेखिका आणि बिझनेस कन्सल्टंटही आहे. तिनं TLCच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यात तिने तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबाबत खुलासा केला होता. अनेकांना पैसे वाचवण्याचे हे उपाय विचित्र वाटत असतील; पण त्याची आपण पर्वा करत नसल्याचं अ‍ॅमी सांगते. करोडपती असूनही कंजूषपणा करण्याबद्दल अ‍ॅमीला जराही वाईट वाटत नाही.

First published:

Tags: Shocking, Social media trends, Top trending, Viral, Viral news