Home /News /viral /

या फोटोत किती हत्ती आहेत सांगा; VIDEO तून खरं उत्तर पाहून तर चक्रावूनच जाल

या फोटोत किती हत्ती आहेत सांगा; VIDEO तून खरं उत्तर पाहून तर चक्रावूनच जाल

या फोटोतील हत्तीचा नेमका आकडा सांगण्यात भलेभले फेल झाले आहेत, पाहुयात तुमचं उत्तर बरोबर येतंय का?

  मुंबई, 25 जानेवारी : या फोटोत किती हत्ती (elephant photo) आहेत असं विचारल्यावर पाहताच क्षणी तुम्ही म्हणाल चार. बरोबर ना! मात्र तुमचं उत्तर चुकीचं आहे. या एका फोटोत चार नाही तर सात हत्ती आहेत. आता तुम्ही पुन्हा नीट मोजाल की नेमके किती हत्ती आहेत. तरी तुम्हाला चारच हत्ती दिसतील. तुम्ही म्हणाल की या फोटोत चार नाही तर सात हत्ती आहेत असं सांगून आम्हीच चूक करत आहोत. मात्र खरंच या फोटोत चार नाही तर सात हत्ती आहेत आणि हे आम्ही नाही तर वाइल्ड लेन्सने सांगितलं. अनेकदा आपण म्हणतो ना दिसतं तसं नसतं. नदीवरील पाणी पिणाऱ्या या हत्तींचा आधी फोटो आणि मग त्यांचा व्हिडीओ याबाबतीत हे तंतोतंत लागू पडतं. वाइल्ड लेन्सने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर हा हत्तींचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी एका फ्रेमध्ये सात हत्ती असल्याचं म्हटलं आहे. हे ट्वीट पाहून नेटिझन्सनाही प्रश्न पडला की या फोटोत तर चारच हत्ती दिसत आहेत. मग इतर तीन हत्ती आहेत कुठे? दिसत नाहीत ते. मग ट्वीटवर सुरू झाली या हत्तींना शोधण्याची स्पर्धा. हे वाचा - संतप्त हत्ती JCB चा चुराडा करायला गेला पण...; विचारही केला नसेल असा VIDEOचा शेवट बहुतेक ट्वीटर युझर्सना चारच हत्ती दिसले. काही जण पाच ते सहा हत्तीपर्यंत पोहोचले. यानंतर वाइल्ड लेन्सने आकड्यांसह या हत्तीचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा असे हत्ती दाखवण्यात आले. मात्र सातवा हत्ती असूनही दिसून शकत नाही तो या फोटोत दाखवता येऊ शकत नाही असं म्हटलं आहे.
  वाइल्ड लेन्सने या हत्तीचा व्हिडीओ शेअर केला  हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.  व्हिडीओत आपण पाहू शकतो. नदीतील पाणी प्याल्यानंतर एकेएक हत्ती बाजूला होतो. सर्वात आधी एक छोटा हत्ती दिसतो. त्यानंतर इतर तीन हत्ती बाजूला होतात. त्यापैकी आधीच्या छोट्या हत्तीच्या दिशेने गेलेल्या एका मोठ्या हत्तीसह आणखी एक छोटा हत्ती दिसतो आणि नीट पाहाल तर इतर जे दोन मोठे हत्ती एकत्र चालत आहेत त्यांच्यामध्येही एक छोटासा हत्ती आहे. असे झाले एकूण सहा हत्ती आणि सातवा हत्ती जो सर्वात शेवटी पाणी पिऊन त्या हत्तींच्या मागे मागे चालू लागतो. हे वाचा - मेंढीशी पंगा घेणं व्यक्तीला पडलं भारी; अखेर ओढावली अशी वेळ की...; Watch Video आहे की नाही गंमत. व्हिडीओ पाहिल्यानंतर फोटोबाबत असलेलं तुमचं कन्फ्युझन दूर झालं की नाही? म्हणजे फोटोत चार नाही तर सातच हत्ती आहेत. आता तुम्ही तुमच्या मित्रांनादेखील या फोटोचं मजेशीर चॅलेंज द्या आणि पाहा त्यांना यामध्ये किती हत्ती दिसत आहेत आणि अर्थात तुमच्या मित्रासह लावलेल्या या चॅलेंजमध्ये तुम्हीच बाजी माराल. हो की नाही?
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Elephant, Viral, Viral photo, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या