मुंबई, 7 डिसेंबर : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन आणि पझल्स खूप लोकप्रिय आहेत. बुद्धीचा कस पाहणारी ही कोडी सोडवणं अनेकांना आवडतं. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आणखीही काही कोडी व्हायरल होत असतात. असंच एक कोडं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतंय. यात एक गोळ्यागोळ्यांचं चित्र आहे. ते गोळे इंग्रजी 8 आकड्यासारखे दिसतायत; मात्र नेमके किती 8 या चित्रात आहेत, हेच शोधण्याबाबत हे कोडं आहे. अनेकांनी आत्तापर्यंत ते सोडवण्याचा प्रयत्न केलाय. काहींनी 4, तर काहींनी 6 असं उत्तर दिलंय. तुम्हीही पाहा, तुम्हाला किती '8' दिसतात.
सोशल मीडियावर येणारी अनेक कोडी खूप मजेशीर असतात. काहींचं उत्तर लगेच सापडतं, तर कोडी काही बराच वेळ डोकं खाजवायला लावतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोड्यांमध्ये डोळ्यांना गोंधळून टाकणारं एक चित्र आहे. यात अनेक गोळे आहेत. पाहताक्षणीच ते इंग्रजी 8 आहेत, हे लक्षात येतं; मात्र ते एकमेकांना असे चिकटले आहेत, की त्यांची मोजणी करणं अवघड होतं. हेच नेमकं वाचकांना शोधायचं आहे. वरवर पाहता हे खूप सोपं वाटतं; मात्र मोजायला लागल्यावर नजर फिरते आणि गोंधळ होतो.
खरं तर चित्रामध्ये 8 अशा पद्धतीनं लिहिले आहेत, की वाचकांचा गोंधळ होण्याचं काहीच कारण नाही; मात्र तरीही काहींना ते अवघड वाटतंय. काळजीपूर्वक पाहिलं, तर नीट लक्षात येईल आणि कोड्याचं निश्चित उत्तर सापडेल. काहींनी तसा प्रयत्न केला खरा; पण नेमकं उत्तर त्यांना सापडलं नाही. काहींनी 4, काहींनी 6, तर काहींनी 8 असं उत्तर दिलं; मात्र हे योग्य उत्तर नाही.
हे चित्र सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आलाय. या कोड्यामध्ये तुमची तार्किक बुद्धिमत्ता आणि नजरेचा कस लागतो. अनेकांना यात 8 तर दिसतात, मात्र ते नक्की किती आहेत, हे सांगता येत नाही. याचं योग्य उत्तर 9 असं आहे. तुमचंही उत्तर 9 असंच आलं असेल, तर तुम्ही बुद्धिमान आहात हे सिद्ध होईल. तसंच तुमचा कॉमन सेन्सही चांगला आहे, असं म्हणता येईल. इंग्रजी 8 ची आकृती डोळ्यांसमोर आणून कोणकोणत्या प्रकारे 8 होऊ शकतात, हे पुन्हा एक तपासा. म्हणजे उभे, आडवे, सुलटे-उलटे अशा विविध पद्धतींनी तपासल्यावर 9 हे योग्य उत्तर मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.