मराठी बातम्या /बातम्या /Viral /फ्रीजमध्ये अन्न किती काळ साठवणे सुरक्षित? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा

फ्रीजमध्ये अन्न किती काळ साठवणे सुरक्षित? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

रेफ्रिजरेटरमध्ये जास्त वेळ ठेवलेले अन्न खाण्याचे तोटे काय आहेत आणि ते किती दिवसांपर्यंत ठेवावे हे जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. माणसाचा बऱ्याच गोष्टींसाठीचा वेळ वाचला आहे. त्यापैकी गृहीणींसाठी सगळ्यात महत्वाचं असलेलं म्हणजे फ्रिज. महिलांना अन्न, भाज्या किंवा जेवणाशी संबंधीत अनेक गोष्टी स्टोर करुन ठेवायला फायदा होतो.

अनेक लोक रेफ्रिजरेटरमध्ये शिजवलेले अन्न देखील ठेवतात आणि ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी काढतात. तसेच काही लोक अनेक दिवस फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खातात. पण असं असलं तरी तज्ज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात.

हे ही पाहा : महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं

रेफ्रिजरेटरमध्ये जास्त वेळ ठेवलेले अन्न खाण्याचे तोटे काय आहेत आणि ते किती दिवसांपर्यंत ठेवावे हे जाणून घ्या.

तज्ज्ञांच्या मते फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात, असा लोकांचा समज आहे, जो चुकीचा आहे. उलट, स्वयंपाक करतानाच अन्नातील अनेक घटक नष्ट होतात.

तज्ञ काय म्हणाले

ते म्हणतात, 'पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे हे सर्वात अस्थिर आणि सहज गमावले जाणारे पोषक असतात. त्यामुळे बहुतेक पैष्टीक गोष्टींचं नुकसान स्वयंपाक करताना होतं. उष्णता जीवनसत्त्वे नष्ट करते, त्यामुळे ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतर जास्तीत जास्त एक आठवड्यापर्यंत ते फ्रिजमध्ये ठेवू शकता.

भातामध्ये बॅक्टेरिया जन्म घेऊ शकतात, त्यामुळे जास्ती जास्त दोन दिवसात ते खावे. पण भारतीय पदार्थ खारट, आंबट आणि मसालेदार असतात, त्यामुळे ते आपोआप फ्रीज-फ्रेंडली होतात.

फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे?

अंडी, दुग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री, मांस यासारख्या नाशवंत वस्तू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्यात. तसेच, ते आठवडाभरात सेवन करावे. तर ब्रेड, फळे, भाज्या जास्त काळ साठवून ठेवता येतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्नावर तीन ते चार दिवसांनी बॅक्टेरिया वाढू लागतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फ्रिजमध्ये जास्त काळ अन्न ठेवल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बॅक्टेरियामुळे अन्नाचा रंग, वास आणि चव बदलत नसल्यामुळे ते सुरक्षित आहे की नाही हे कळणे कठीण आहे. पण जितकं फ्रेश जेवण तुम्हाला खाता येणं शक्य आहे, तितकं फ्रेश अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

First published:

Tags: Food, Lifestyle, Social media, Social media trends, Viral