...म्हणून नेहमी आपल्या आईलाच सापडते आपली हरवलेली वस्तू, एका आईनेच दिलं उत्तर

...म्हणून नेहमी आपल्या आईलाच सापडते आपली हरवलेली वस्तू, एका आईनेच दिलं उत्तर

शोधलं की सापडतं हे वाक्य गेल्या काही काळात प्रसिद्ध झालं. पण आपली रोजच्या वापरातील वस्तू हरवली की ती शोधणं महाकठीण होऊन बसतं, पण समस्त 'आई'वर्ग ती वस्तू नजरेआड नव्हतीच अशा पद्धतीने शोधून देतात.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : पालकांचं प्रेम, विशेषत: आईचं प्रेम आणि तिची काळजी, माया हे सर्वांच्याच भावनिक स्थिरतेसाठी एक उत्तम स्त्रोत आहेत. कितीही मोठे झालो किंवा कुठेही राहत असलो तरीही आपल्यातील बहुतेक जणं सल्ला घेण्यासाठी किंवा मदतीसाठी आईपाशीच जातात. त्यात एखादी वस्तू शोधणं सर्वांसाठी एक कठीण काम असते. पण जेव्हा आपण दिवसभरात लागणाऱ्या रोजच्या वापरातील वस्तू शोधण्यासाठी धडपडत असतो तेव्हा त्या आपल्याला सापडत नाहीत पण काही क्षणातच आपल्या आईला सापडतात. हे का होऊ शकतं यामागील कारणं सांगणारी एक इंस्टाग्राम पोस्ट समोर आली आहे.

'मदर विथ साईन' (@motherwithsign) नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवर पूनम सप्रा (Poonam Sapra) यांनी एक मेसेज लिहिलेले पोस्टर हातात घेऊन एक फोटो पोस्ट केला आहे. पूनम यांनी एकदम क्यूट स्माइलसह हा फोटो पोस्ट केला आहे. 'तुम्हाला कधीही न सापडणाऱ्या गोष्टी तुमच्या आईला सापडतात या मागचं कारण म्हणजे ती तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते.' असा मेसेज सप्रा यांनी शेअर केला आहे.

View this post on Instagram

Socks, keys, that t-shirt and wallet — she always knows where you'd keep it before you keep it there, bachhas ❤️

A post shared by Poonam Sapra (@motherwithsign) on

या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की, 'मोजे, चाव्या, टी-शर्ट आणि पाकिट आपण कुठेही ठेवण्याआधीच तिला माहीत असतं की आपण ते कुठे ठेवणार आहोत, Bachhas'. पूनम सप्रा यांचा हा मेसेज अनेकांसाठी खरा आहे. अनेकदा तुमच्यासोबतही असा प्रसंग घडला असेल.

ही पोस्ट शेअर केल्यापासून इन्स्टाग्रामवर जवळपास 25000 पेक्षाही जास्त लाईक्स आणि अनेक रंजक कमेंट्स आल्या आहेत. पूनम यांच्या या पोस्टवर एका युजरने लिहिले आहे की, तिची दोन्ही मुलं असं म्हणतात की, एखादी वस्तू आईला सापडत नाही तोपर्यंत ती हरवलेली नाही आहे. एका युजरने असे म्हटले आहे की, सर्व आईंनी Harry Potter च्या आधीच Hocruxes शोधला असता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 28, 2020, 9:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या