Home /News /viral /

या प्रेमाला काय म्हणाल? रुग्णालयानं 81 वर्षांच्या पत्नीची भेट नाकारली म्हणून पतीनं काय केलं पाहा VIDEO

या प्रेमाला काय म्हणाल? रुग्णालयानं 81 वर्षांच्या पत्नीची भेट नाकारली म्हणून पतीनं काय केलं पाहा VIDEO

81 वर्षीय स्टेफन बोजिनी यांच्या पत्नी जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयानं परवानगी दिली नाही.

    मुंबई, 13 नोव्हेंबर : प्रत्येकवेळी प्रेम व्यक्त केलं की ते असतं अस नाही. काहीवेळ अबोल प्रेमाची कथा काही वेगळीच असते. प्रेम आणि आपलेपणा व्यक्त करण्यासाठी एका व्यक्तीनं संगीताचा आधार घेतला आहे. आपला भावना व्यक्त करण्यासाठी त्यानं वाद्य वाजवलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीची पत्नी रुग्णालयात उपचार घेत असताना तिची भेट घेण्यासाठी रुग्णालयानं नाकारलं. त्यावेळी काही क्षण हताश वाटलेला हा व्यक्ती पुढच्या क्षणी एक वाद्य घेऊन आला. मी आहे आणि या व्यक्तीचं त्याच्या पत्नीवर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी या व्यक्तीनं चक्क रुग्णालयाबाहेर रस्त्यावर बसून वाद्य वाजवण्यास सुरुवात केली. ही घटना इटलीमधील कॅस्टेल सॅन जिओव्हानी शहरात घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तीनं वाजवलेल्या वाद्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो अनेक युझर्सनी पसंत केला आहे. या व्यक्तीच्या व्हिडीओला अक्षरश: लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सीएनएन ने दिलेल्या वृत्तानुसार 81 वर्षीय स्टेफन बोजिनी यांच्या पत्नी जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयानं परवानगी दिली नाही. त्यांनं वाद्य घेतलं आणि रुग्णालयाबाहेर आपल्या पत्नीला आवडणारं गाणं वाजवलं. त्याच दरम्यान या व्यक्तीचा व्हिडीओ काढण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हे वाचा-केळी खाण्यासाठी हत्तीनं अडवली बस, पुढे काय झालं पाहा VIDEO चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी स्टुलवर बसून त्यांनी हे गाणं वाजवलं. या गाण्याची धून ऐकताच पत्नीला राहावलं नाही आणि दुसऱ्या मजल्यावरून तिने आपल्या पतीला पाहिलं. हा व्यक्ती देखील तिच्याकडे पाहून गाण्याची धून वाजवत राहिला. फेसबुकवर 8 नोव्हेंबर पोस्ट केला होता. ज्याला आतापर्यंत 646 हून अधिक शेअर 200 हून अधिक कमेंट्स केल्या आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या