नवी दिल्ली 23 जानेवारी : स्वतःवर विश्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडता येतं. स्वतःवर विश्वास ठेवून आपलं ध्येय गाठणंही शक्य होतं. आयुष्यात अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे आपण निराश होतो आणि आशा सोडून देतो. आपण मानसिकरित्या खचतो. मात्र, ज्याला स्वतःवर विश्वास असतो, तो यानंतर पुन्हा नव्याने उभा राहातो आणि बरोबर रस्ता शोधून आपलं ध्येय गाठतोच. हे गोष्ट अगदी सगळ्यांनात लागू होते. सोबतच हे गरजेचं नाही की ही शिकवण तुम्हाला एखादा माणूसच देईल, अनेकदा प्राणीही आपल्याला अशा गोष्टी शिकवून जातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल
(Viral Video of a Horse) होत आहे. हा व्हिडिओ एका घोड्याचा आहे. जो आयुष्यातील सर्वात मोठा धडा देताना दिसतो.
आईचं प्रेम! पिल्लाला वाचवण्यासाठी थेट सापासोबत भिडली उंदरीण; हैराण करणारा VIDEO
यात दिसतं की एक घोडा दोन ट्रेनच्या मध्ये अडकला आहे. मात्र, अडचणींपुढे हार न मानता आणि आपलं लक्ष्य कायम ठेवून तो धावत राहातो. अखेर स्वतःला या संकटातून बाहेर काढण्यास तो यशस्वी ठरतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे हा घोडा दोन ट्रेनच्या मध्ये अडकला आहे. मात्र, इकडे-तिकडे लक्ष न देता, तो सरळ धावत राहातो
(Horse Running with Train). अखेर एक ट्रेन पास झाल्यानंतर तो दुसऱ्या रुळावरुन धावू लागतो आणि स्वतःचा जीव वाचवतो.
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, घोडा दोन ट्रेनच्या मध्ये अडकला. त्याला धावायला येत होतं आणि तो रस्ता न बदलता धावत राहिला. अखेर तो बाहेर निघालाच. छोटासा हा व्हिडिओ आयुष्याबद्दल अगदी मोठा संदेश देऊन जातो. संकटं आली की खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहाणं, महत्त्वाचं आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 45 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 12 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. काहींनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, आयुष्यात समतोल राखणं महत्त्वाचं आहे. तर आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, ‘जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.