मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : मालकासाठी नव्हे तर 'या'साठी 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला घोडा; कारण जाणून व्हाल भावुक

VIDEO : मालकासाठी नव्हे तर 'या'साठी 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला घोडा; कारण जाणून व्हाल भावुक

व्हिडिओमध्ये एक घोडा वेगाने पळत असल्याचं दिसतं. तो जवळपास 8 किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला (Horse ran Behind Ambulance for 8 KM) .

व्हिडिओमध्ये एक घोडा वेगाने पळत असल्याचं दिसतं. तो जवळपास 8 किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला (Horse ran Behind Ambulance for 8 KM) .

व्हिडिओमध्ये एक घोडा वेगाने पळत असल्याचं दिसतं. तो जवळपास 8 किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला (Horse ran Behind Ambulance for 8 KM) .

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 03 एप्रिल : कोण म्हणतं की प्राण्यांना (Animals) नात्यांचा अर्थ कळत नाही? कोण म्हणतं की प्राण्यांना भावना नसतात? कोण म्हणतं ते भावनिक नसतात? हे सर्व प्रश्न चुकीचे आहेत. हे सर्व भ्रम चुकीचे आहेत की भावना, नातं, आपुलकी याचा अर्थ फक्त मानवालाच कळतो. प्राणी कधी कधी माणसांपेक्षा जास्त भावुक होतात, हे एका व्हिडिओने (Viral Video of Horse) पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

OMG! श्वानाला असं काही करताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल; VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

IFS सुशांत नंदा यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओला काही तासांतच जवळपास 68 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये एक घोडा वेगाने पळत असल्याचं दिसतं. तो जवळपास 8 किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला (Horse ran Behind Ambulance for 8 KM). मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णवाहिकेत त्याची एक आजारी बहीण होती, जिला उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होतं.
घोड्याचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनीच असं म्हटलं की प्राण्यांना भावना नसतात, हा समज चुकीचा आहे. प्राण्यांना नाती आणि भावना कळत नाहीत, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. अनेकदा अशा काही घटना समोर येतात, ज्यातून समजतं की मुके प्राणी माणसापेक्षा जास्त नात्यांचा आणि भावनांचा आदर करतात. या प्राण्यांना ज्याचा लळा लागतो, त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. सध्या याचीच प्रचिती देणारा धावणाऱ्या घोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

VIDEO - टीव्हीत वाघाला पाहताच जीव वाचवण्याची धडपड; तरुणाने उचललं खतरनाक पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, या घोड्याची बहीण आजारी होती तिला पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावे लागले म्हणून एक रुग्णवाहिका आली, ज्यामध्ये घोडीला ठेवण्यात आलं आणि रुग्णवाहिका तिथून निघाली. यानंतर दिसलं की घोडीचा भाऊ, जो नेहमी तिच्यासोबत असतो, तो रुग्णवाहिकेच्या मागे धावायला लागला. रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये थांबेपर्यंत तो मागे धावतच राहिला. यामुळे रुग्णालयानेही या घोड्याला तोपर्यंत तिथेच ठेवलं जोपर्यंत त्याची बहीण बरी होऊन पुन्हा घरी परतली नाही. बहिणीसाठी घोड्याने धावत 8 किलोमीटरचा प्रवास केला. हा व्हिडिओ भावुक करणारा आहे.
First published:

Tags: Pet animal, Viral video on social media

पुढील बातम्या