नवी दिल्ली, 02 डिसेंबर : जगात असे बरेच लोक आहेत ज्यांचा दिवस चहाशिवाय सुरू होत नाही. दररोज कामावर जाण्यापूर्वी, एक कप चहाची आवश्यकता सर्वांना असतेच. म्हणून गमतीत चहाला टॉनिक म्हणून ओळखले जाते. मात्र आता माणसांप्रमाणे या घोड्याचा दिवससुद्धा चहाशिवाय सुरू होत नाही. या घोडाचे नाव आहे जेक, जो मागील 15 वर्षांपासून इंग्लंडच्या मर्सीसाइड पोलीस विभागात कार्यरत आहे. मुख्य म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी तो दररोज एक कप चहा पितो.
मेट्रो न्यूजनुसार, 'जेक एकदा त्याच्या ट्रेनरच्या कपातून चहा पित होता. त्यावेळी त्याला चहा इतका आवडला की हा 20 वर्षीय घोडा आता रोज त्याच्या ट्रेनरच्या कपातून चहा पितो. म्हणून मर्सीसाइड पोलीस स्टेशनने जेकच्या सकाळच्या रूटीनमध्ये चहा जोडला. डेली मेलच्या अहवालानुसार, जेक अॅलर्टन लिव्हरपूलजवळील आपल्या तबकात राहतो आणि दररोज सकाळी काम सुरू करण्यापूर्वी त्याला एका मोठ्या कपमध्ये चहा दिला जातो.'
ट्विटरवर या घोड्याचा व्हिडिओ शेअर करताना एका मर्सीसाईड पोलिस अधिकाऱ्याने लिहिले की, 'चहाचा कप येईपर्यंत जेक बिछान्यावरुन खालीही उतरत नाही. चहा प्यायल्यानंतर, तो नेहमीच्या कामासाठी जातो. त्याच वेळी, मर्सीसाइड पोलिसांच्या एका स्पीकरने सांगितले की जेक स्किम दुधाचा चहा पितो आणि त्याच्या चहामध्ये 2 चमचेपेक्षा जास्त साखर नसते.
वाचा-VIDEO : ...आणि भर रस्त्यात मलायका अरोरा गजरेवालीवर भडकली
We have a new episode of #wintermorningwakeups featuring Jake. Jake refuses to get out of bed until he is brought a warm cup of @tetleyuk tea. Once he has drank this he is ready for the day. #StandTall #PHJake #NotStandingAtAll #BrewInBed #TeaTaster pic.twitter.com/iJXm32hlad
— Mer Pol Mounted (@MerPolMounted) November 20, 2019
वाचा-बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान पण...
ट्विटरवर हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. हा व्हिडिओ 2 आठवड्यांपूर्वी शेअर केला गेला होता आणि आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि बऱ्याच लोकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.
वाचा-'आपल्याकडे अणुबॉम्ब पण...' पाकिस्तानी कॉमेडी शोमध्ये उडवली खिल्ली; पाहा VIDEO
So funny. Does Jake take his tea black or a spoon of sugar? Thank you for sharing. I have started my day with a smile. to Jake.
— Cathye Rhodes (@RhodesCathye) November 20, 2019
जेर्क हा 12 घोडांपैकी एक आहे. जो बर्याच काळापासून पोलिसांसोबत काम करतो. मर्सेसाइड पोलिसांच्या माउंटेड सेक्शन मॅनेजर आणि ट्रेनर लिंडसे गावेन यांनी डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार, जेक बाकीच्या घोड्यांपेक्षा अगदी वेगळा आहे. जेव्हा त्याचं चहाबद्दल असलेले प्रेम समजले तेव्हा आम्हालाही धक्का बसला. सगळ्यात विशेष म्हणजे जर कोणी त्याला एक चमचा साखर घालून चहा दिला तर तो पित नाही पण जर त्याला 2 चमचे साखर दिली गेली तर तो खूप आनंदी होतो.