• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! घोड्याने लाथ मारली आणि डोळाच बाहेर पडला; चिमुकलीला पाहून डॉक्टरही हादरले

बापरे! घोड्याने लाथ मारली आणि डोळाच बाहेर पडला; चिमुकलीला पाहून डॉक्टरही हादरले

घोड्याने लाथ मारल्यानंतर चिमुकलीची अवस्था भयंकर झाली आहे.

 • Share this:
  ब्रिटन, 04 सप्टेंबर : आपल्यासोबत कधी कोणती दुर्घटना होईल सांगू शकत नाही. पण अनेकदा ही दुर्घटना इतकी भयंकर ठरू शकते, याचा विचारही आपण केलेला नसतो. असंच एका चिमुकलीसोबत झालं आहे. आपले वडील आणि भावासोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीसोबत भयंकर घटना घडली. तिच्या चेहऱ्यावर घोड्याने लाथ मारली (Horse Kicks Baby Face) आणि तिची अवस्था भयंकर झाली आहे. अवघ्या दोन वर्षांची चिमुरडी जीवनमृत्यूशी झुंज देते आहे. इंग्लंडच्या सर्रेतील ही धक्कादायक घटना. दोन वर्षांची मॅडिसन रूम आपल्या वडिल एलिस्टर आणि मोठ्या भावासोबत शेतावर फिरायला गेली. तिथं खूप घोडे होते. त्यांच्याजवळच ती फिरत होती. अचानक एका घोड्याने मॅडिसनच्या चेहऱ्यावर एक लाथ मारली. ही लाथ इतकी जोरात बसली की तिचा डोळाच अक्षरशः बाहेर आला. हे वाचा - अरे! हे काय? पाण्यात उडी मारताच पूर्ण वेगळे झाले डोक्यावरचे केस; मजेशीर VIDEO मॅडिसनच्या वडिलांनी सांगितलं की त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांचं लक्ष त्याच्याकडे होते. इतक्यात त्यांना त्यांच्यापासून काही दूर असलेल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. तिचा आवाज ऐकून ते तिच्याजवळ धावत गेले. मुलीला पाहताच त्यांना धक्का बसला.  त्यांनी पाहिलं ही तिचा डावा डोळा बाहेरच्या दिशेने आला होता. ते लगेच तिला घेऊन रुग्णालयात गेले. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीची अवस्था पाहिली तेव्हा तेसुद्धा घाबरले. तिला लगेच आयसीयूमध्ये दाखल केलं. तिची सर्जरी करण्यात आली. तिच्या उजव्या डोळ्याच्या वर मोठी खोल जखम होती. तिच्या नाकावरही जखम झाली होती. तिचा डावा डोळा नीट करण्यात आला आहे.  जबडाही नीट करण्यात आला. हे वाचा - VIDEO - एवढासा जीव पण शेवटपर्यंत लढली; खारूताईमुळे चक्क सिंहाची दमछाक आता ती डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. तिला खायला-प्यायलाही त्रास होतो आहे. ती लवकरात लवकर बरी होईल अशी आशा तिच्या पालकांना आहे.
  Published by:Priya Lad
  First published: