Home /News /viral /

बर्फवृष्टीमुळे भीषण अपघात; 50 कार एकमेकांवर आदळून तिघांचा मृत्यू, भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

बर्फवृष्टीमुळे भीषण अपघात; 50 कार एकमेकांवर आदळून तिघांचा मृत्यू, भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

जोरदार बर्फवृष्टीदरम्यान सुमारे पन्नास वाहने एकमेकांवर आदळली (Accident due to Snowfall). या सर्व गाड्या एकमेकांवर इतक्या वेगाने आदळल्या की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला

    वॉशिंग्टन 30 मार्च : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये रस्त्याने चालताना कोणाला अंदाजही आला नसेल की पुढच्याच क्षणी इथे काय घडणार आहे. थोड्याच वेळात इथे अशी घडली की एक-दोन नव्हे तर पन्नास वाहने एकमेकांवर आदळली. होय, पेनसिल्व्हेनियातील शुयलकिल कंट्रीमध्ये जोरदार बर्फवृष्टीदरम्यान सुमारे पन्नास वाहने एकमेकांवर आदळली (Accident due to Snowfall). या सर्व गाड्या एकमेकांवर इतक्या वेगाने आदळल्या की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले. VIDEO : वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू; निधनानंतरही हेळसांडच, 4 महिलांनी 5 KM खांद्यावर नेला वृद्धेचा मृतदेह अपघात होताच परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर ताबडतोब बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आणि जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. शुयलकिल कंट्रीमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Accident Video) होत आहे. यात तुम्ही या विनाशाचं दृश्य पाहू शकता. बऱ्याचदा लोकांना सुखद अनुभूती देणारी ही हिमवृष्टी या घटनेत अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरली. खरंतर, इथे बर्फवृष्टी इतकी होती की लोकांना आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. भरधाव वेगात त्यांच्या गाड्या इकडे तिकडे घसरून एकमेकांवर आदळत होत्या. या धडकेनंतर काही वाहनांना आगही लागली. बापरे! साधीभोळी खारूताईही असं काही करू शकते? खारीचा Shocking Video Viral पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अधिकारी सांगतात की बर्फवृष्टीदरम्यान या भागात दृश्यमानता शून्य होती, ज्यामुळे ही भयंकर दुर्घटना घडली. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच बचाव दलाने घटनास्थळी धाव घेऊन लोकांना वाचवलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking accident, Shocking video viral

    पुढील बातम्या