मुंबई 28 नोव्हेंबर : बाजारात आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या मिळतील. त्याचे जेवणातले वेगवेगळे प्रकार बनवले जातात. या भाजांच्या चवीसोबतच त्यांची किंमत देखील वेगळी असते. आपल्याला साधारण 20, 40, 60, 80 किंवा 100 रुपये किलोपर्यंत भाज्या बाजारात मिळतात. लोक आपल्या आवडती प्रमाणे महागातील भाज्या देखील विकत घेतात आणि ज्यांना नाही परवडत ते आपल्या सोयीनुसलार भाजी विकत घेतात.
पण तुम्हाला जर सांगितलं की एखादी भाजी 85 हजार रुपये प्रति किलो मिळतेय तर? हो तुम्हाला धक्का बसला असला तरी देखील हे खरं आहे. बाजारात इतकी महाग भाजी देखील उपलब्ध आहे.
हे ही वाचा : अशी कोणती गोष्ट आहे, जे लोक मृत्यूनंतरही करू शकतात? तुम्हाला माहितीय या प्रश्नाचं उत्तर
आता हे ऐकून तुम्ही म्हणाल महागाई वाढली आहे. त्यामुळे गोष्टी महाग होणं सहाजिक आहे. पण म्हणून इतकं महाग? भाजी काय सोन्याची आहे का? एवढ्या पैशात तर आम्ही एक किलोपेक्षा जास्त सोनं विकत घेऊ. तर ही भाजी थोडी खास आहे. चला या भाजीबद्दल जाणून घेऊ की यामध्ये असं काय खास आहे, ज्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त आहे.
हॉप शूट्स असं या भाजीचं नाव आहे. बाजारात हॉप शूट्स भाजीची किंमत 85 हजार ते एक लाख रुपये किलोपर्यंत आहे. ही भाजी यूरोपीय देशांमध्ये आढळते.
हॉप शूट्स हिरवी आणि शंकूच्या आकाराची फुले असतात. याचा उपयोग बिअर तयार करण्यासाठी केला जातो.
या भाजीपासून बियर तयार केली जाते
ही भाजी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. असे म्हटले जाते की हिमाचल प्रदेशात यापूर्वी हॉप शूट्स वाढवले जात होते. ही भाजी पिकवण्याची प्रक्रिया इतकी लांबली आहे की त्याची काढणी करण्यासाठी 3 वर्षे लागतात.
या भाजीच्या काढणीचे कामही अत्यंत कठीण आहे. या भाज्यांच्या फुलांना 'हॉप कोन' म्हणतात. याचा उपयोग अनेक आजारांवर होतो. त्याचबरोबर याच्या फुलापासून बीअरही बनवली जाते आणि याच्या उर्वरित फांद्यांचा वापर भाजी तयार करण्यासाठी केला जातो.
हॉप शूटची चव तिखट असते. भाज्यांशिवाय त्याचं लोणचंही बनवलं जातं. ब्रिटन आणि जर्मनीसारख्या युरोपियन देशांमध्ये होप शूटची लागवड सर्वात जास्त केली जाते. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये या भाजीवर कर लावण्यात आला होता.
हॉप शूट्समध्ये औषधी गुणधर्म
हॉप शूटचे औषधी गुणधर्म शतकानुशतके आधी ओळखले गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक वैद्यकीय अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, भाजीला टीबीविरूद्ध अँटीबॉडीज बनवण्यासाठी हॉप शूटचा वापर केला जातो. याशिवाय तणाव, निद्रानाश, चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि डेफिसिट-हायपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डरच्या उपचारात या भाजीचा वापर केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral