गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असं सांभाळलं बॅलेन्स, पोलीसही झाले अवाक् LIVE VIDEO
राज्य पोलीस दलाकडून नागपूर पोलिसांना 10 सेल्फ बॅलेन्स टू-व्हील स्कूटर देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून गस्त घालण्यासाठी या स्कूटरचा वापर केला जाणार आहे.
नागपूर, 13 डिसेंबर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नेहमी आपल्या दिलखुलास अंदाजामुळे चर्चेत असतात. असा होमग्राऊंड नागपूरमध्ये एका कार्यक्रमातला अनिल देशमुख यांचा व्हिडीओ समोर आला आहे. चक्क अनिल देशमुख यांनी सेल्फ बॅलेन्स टू-व्हील स्कूटर चालवण्याचा प्रयत्न केला
राज्य पोलीस दलाकडून नागपूर पोलिसांना 10 सेल्फ बॅलेन्स टू-व्हील स्कूटर देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून गस्त घालण्यासाठी या स्कूटरचा वापर केला जाणार आहे. त्या प्रत्यक्ष सेवेत रुजू करून घेण्याचा सोहळा पोलीस जिमखान्यात पार पडला. या सोहळ्याला मुख्य अतिथी गृहमंत्री अनिल देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.
स्कूटरचा बॅलेन्स करत अधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सलामी दिली. अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या स्कूटरची ट्रायल घेण्याचा मोह मग गृहमंत्र्यांना काही आवरला नाही. त्यांनी लगेच एका स्कूटरची ट्रायल घेण्यासाठी पुढे आले. महिला पोलीस कर्मचारी खाली उतरली आणि स्कूटरचा गृहमंत्र्यांनी घेतला. पण, गृहमंत्री स्कूटरवर उभे राहिले खरे पण तोल सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागली.
महिला पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच देशमुख यांच्या स्कूटरला आधार दिला. त्यामुळे गृहमंत्र्यांनी काही फूट अंतर स्कूटरने यशस्वीपणे पार केले. खुद्द गृहमंत्र्यांनीच स्कूटर चालवून दाखवल्यामुळे उपस्थितीत पोलिसांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं.
अनिल देशमुख यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.