Home /News /viral /

अरारा खतरनाक! 5 हजारांच्या बिलवर वेटरला दिली 1.5 लाखांची टिप, प्रसिद्ध अभिनेत्यानं केला कहर

अरारा खतरनाक! 5 हजारांच्या बिलवर वेटरला दिली 1.5 लाखांची टिप, प्रसिद्ध अभिनेत्यानं केला कहर

कधी एका चॅलेंजमुळे लाखांची टिप दिल्याचे ऐकले आहे? 2020मध्ये भलत्याच चॅलेंजमुळे एक वेट्रेस लखपती झाली आहे.

    इलिनॉयस, 04 जानेवारी : हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेल्यानंतर वेटरला टिप देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा सर्वच नाक मुरडता. मुळात टिपही त्या हॉटेलमधील खाणे, परिसर, वातावरण यावरून दिली जाते. मात्र कधी एका चॅलेंजमुळे लाखांची टिप दिल्याचे ऐकले आहे? 2020मध्ये भलत्याच चॅलेंजमुळे एक वेट्रेस लखपती झाली आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसले की 5 हजारांच्या बिलवर चक्क दीड लाखांची टिप ठेवली. त्यामुळं अमेरिकेतील इलिनॉयसमध्ये राहणाऱ्या एका वेट्रेसच्या नववर्षाची सुरुवात दणक्यात झाली. सोशल मीडियावर सध्या #2020tipchallenge सुरू आहे. ज्यामध्ये वर्षाच्या आकड्यानुसार टिप ठेवणे बंधनकारक असते. यात अनेक लोकांनी जास्तीत जास्त टिप ठेवल्या. यात 2020 ते 20.20 डॉलर टिप ठेवली जाते. हेच चॅलेंज स्वीकारले हॉलीवूडचा अभिनेता आणि गायक डॉनी वाह्लबर्ग यानं. डॉनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या पत्नीसोबत सेंट चार्ल्स येथील IHOP रेस्टोरंटमध्ये गेला होता. यावेळी या दोघांनी 78 डॉलर म्हणजे 5,597 रुपयांचे जेवण केले. वाचा-पॅडमध्ये अडकली बॅट अन् उडाली दांडी! क्रिकेटमधला हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच वाचा-वेडेपणाचा कहर! चहासोबत तरुणीनं खाल्लं चिकन, VIDEO VIRAL जेनीने या बिलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर डॉनीने हे बिल भरल्यानंतर 2020 डॉलर म्हणजेच 1 लाख 40 हजारांची टिप ठेवली. या टिपमुळे त्यांना जेवण देणारी वेट्रेस डेनिएल फ्रेंजोनी प्रचंड खुश झाली. वाचा-होणाऱ्या बायकोचा मेहुण्याबरोबरचा अश्लील VIDEO नवऱ्याने भर लग्नातच दाखवला डॅनीनं टाकलेल्या या फोटोनंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे. याआधी 2018मध्येही असेच चॅलेंज आले होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या