Home /News /viral /

पाळीव कुत्र्याचा वाढदिवसाचं लागलं होर्डिंग, शुभेच्छूक पाहून आवरेना हसू

पाळीव कुत्र्याचा वाढदिवसाचं लागलं होर्डिंग, शुभेच्छूक पाहून आवरेना हसू

नेत्यांच्या वाढदिवसांचे आणि त्यांच्या समर्थकांचे जसे होर्डिंग लावतात, तसंच एक होर्डिंग कुत्र्याच्या वाढदिवसाचं आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या इतर कुत्र्यांचं लागलं.

    भोपाळ, 25 डिसेंबर: आपल्या पाळीव कुत्र्याच्या (Pet Dog) वाढदिवसाच्या (Birthday) आनंदाप्रित्यर्थ त्याच्या मालकांनी (Owner) भर चौकात एक होर्डिंग (Hoarding) लावलं असून त्यावरील मजकूर सर्वांनाच हसायला भाग पाडत आहे. साधारणतः गल्लीतील नेत्यापासून ते मोठमोठ्या पुढाऱ्यांपर्यंत अनेकांची वेगवेगळ्या निमित्तानं होर्डिंग्ज लावण्याची पद्धत भारतात आहे. विशेषतः वेगवेगळ्या ग्रामीण भागात ही पद्धत जोरदार सुरू असते आणि पोस्टर किंवा बॅनरवर आपला फोटो झळकणं, ही अभिमानाची बाब मानली जाते. याच संकल्पनेचा उपयोग करत एकाने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. लावलं असं होर्डिंग मध्यप्रदेशातील बैतूल भागात एका मालकानं आपल्या कुत्र्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. आपला पाळीव कुत्रा ‘वफादार’च्या गळ्यात फुलांचा हार घातलेला फोटो आणि त्याला शुभेच्छासंदेश हा मजकूर ठळकपणे होर्डिंगच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसतो. त्यानंतर त्याला शुभेच्छा देणाऱ्या आजूबाजूच्या इतर कुत्र्यांचे फोटो लावले आहेत. ज्याचा वाढदिवस आहे, तो मुख्य कुत्रा आणि त्याला शुभेच्छा देणारे इतर कुत्रे असा मजेशीर फोटो शहराच्या मध्यवर्ती भागात झळकत आहे. कुत्र्यांची नावं वाचून येतं हसू होर्डिंगवर ज्या कुत्र्यांचे फोटो लावले आहेत, त्यांची मजेशीर नावंदेखील त्याखाली लिहिण्यात आली आहेत. झांकीबाज, धोकेबाज, मौका परस्त, दलबदलू, चापलूस, खुजली, छर्रा, फेंकोफाल आणि पहचानो कौन अशी नावं या कुत्र्यांच्या फोटोखाली लिहिण्यात आली आहेत. ही नावं वाचून अनेकांना हसू आवरत नसल्याचं चित्र आहे. नेत्यांच्या धर्तीवर आपल्या कुत्र्याचे फोटो लावून होर्डिंग संस्कृतीचा उपरोधिक निषेध करणारा प्रयोग म्हणूनही या प्रकाराकडं पाहिलं जात आहे. हे वाचा -वर्षाचा शेवट शेतकऱ्यांसाठी ठरणार वाईट; राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, IMDचा इशारा फोटो होतोय व्हायरल या कुत्र्याची त्याच्या मालकासोबतची केमिस्ट्री भन्नाट असून त्याच्यावरच्या प्रेमातूनच त्याने हे होर्डिंग लावल्याचं त्याच्या मित्रांनी म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Photo viral

    पुढील बातम्या