Home /News /viral /

VIDEO - नशीब म्हणावं की चमत्कार! आधी बाईकला धडकला, नंतर बससमोर आला; भयंकर अपघातातूनही बचावला चिमुकला

VIDEO - नशीब म्हणावं की चमत्कार! आधी बाईकला धडकला, नंतर बससमोर आला; भयंकर अपघातातूनही बचावला चिमुकला

लागोपाठ दोन गाड्यांसमोर येऊनही चिमुकल्याला साधं खरचटलंही नाही.

    तिरुवनंतपुरम, 24 मार्च : एखाद्या भरधाव गाडीने धडक दिली तर काय होऊ शकतं, याची कल्पना तुम्हाला आहेच. असं असताना एकाच वेळी लागोपाठ दोन वेळा अपघात झाला तर त्या व्यक्तीचं वाचणं अशक्यचं. पण एका लहान मुलाच्या बाबतीत मात्र चमत्कार घडला आहे. आधी तो एका बाईकला धडकला, त्यानंतर एका भरधाव बससमोर आला. तरी हा मुलगा बचावला. त्याला साधं खरचटलंही नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Child survived in accident). अपघाताचं भयानक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  व्हिडीओत पाहू शकता एक सिंगल लेन रस्ता दिसतो आहे. एक बाईक समोरून येताना दिसते आहेत. इतक्या रस्त्याच्या एका बाजूने एक मुलगा सायकलवरून येतो आणि धाडकन या बाईकला धडकतो. यामुळे बाईकस्वार तर नियंत्रण गमावत नाही तो तसाच पुढे निघून जातो. पण सायकल हवेत उडते आणि त्यावरील मुलगा पडतो. हे वाचा - बापरे बाप! तरुणाने हवेत उडवली लक्झरी कार; खतरनाक STUNT VIDEO पाहताच पोलीसही त्याच्या शोधात इतक्यात मागून लगेच भरधाव बस येते. सर्वकाही इतक्या वेगात होतं की बाईकस्वार आणि बस ड्रायव्हरलाही ब्रेक मारायला वेळच मिळत नाही. सायकल त्या बसखाली येते. बस सायकलला चिरडून पुढे जाते. सुदैवाने मुलगा या सायकलसोबत नसतो. जेव्हा बाईकला धडकून सायकल हवेत उडते तेव्हा सायकल तिथेच पडते पण त्यावर बसलेला मुलगा उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जातो. त्यामुळे त्याचा जीव वाचतो. मुलगा स्वतःच उठून उभा राहिलेलाही दिसतो. हे वाचा - धक्कादायक! मालकिणीला लिफ्टमध्ये घसटत नेलं आणि...; पाळीव श्वानाचं भयंकर कृत्य CCTV मध्ये कैद व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या फिल्ममधील सीन वाटेल. पण ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. केरळच्या कन्नूरमधील तालीपरम्बाजवळी चोरुकलामध्ये हा अपघात झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Kerala, Viral, Viral videos

    पुढील बातम्या