Home /News /viral /

Hit and Run चा धक्कादायक LIVE VIDEO; भरधाव वेगाने येणाऱ्या कारने घेतला जीव

Hit and Run चा धक्कादायक LIVE VIDEO; भरधाव वेगाने येणाऱ्या कारने घेतला जीव

हा व्यक्ती नवं घर उभं करण्यासाठी बाजारात सामान घ्यायला आला होता, आणि तोच...

    हल्द्वानी, 19 जानेवारी : हल्द्वानीमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रोड पार करीत असताना एका व्यक्तीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. कार अपघातात हा व्यक्ती काही मीटरपर्यंत कारसोबत फरफटक गेला. या अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि काळी वेळानंतर जागेवरच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीला धडक दिल्यानंतरही चालकाने कारही थांबवली नाही, तो तेथून फरार झाला. (Hit and Runs shocking LIVE VIDEO The speeding car took life) हा संपूर्ण प्रकार दुकानावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साधारण 4 वाजता घडली. सीओ सिटी हल्द्वानी भूपेंद्र धोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने कार आणि चालकाचा शोध घेत आहेत. लवकरच पोलीस कार व कारचालकाला शोधतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्हीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मागून एका व्यक्तीला धडक दिली. ज्यानंतर व्यक्ती काही मीटरपर्यंत फरफटत गेला. हे ही वाचा-पत्नीच्या हत्येनंतर 24 तास सुरू होती डॉक्टरची प्लानिंग; YouTube वरही केलं सर्च यादरम्यान त्या व्यक्तीसोबत उभ्या असलेल्याला काहीच कळलं नाही. मात्र त्याने रस्त्यावर पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. तो तातडीने आपल्या साथीदाराच्या दिशेने धावत गेला. तो रक्ताळलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या आपल्या मित्राला उचलताना दिसत आहे. त्याने त्याला रस्त्याच्या कडेला आणलं. त्यानंतर काही लोक मदतीसाठी धावत येताना दिसत आहे. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. रस्ते अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याने जीव सोडला. सांगितलं जात आहे की, मृत व्यक्ती घर तयार करण्यासाठी काही सामग्री घेण्यासाठी आला होता. नैनीताल रोडवर गाड्या भरधाव वेगाने येत असल्याने अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे. (Hit and Runs shocking LIVE VIDEO The speeding car took life) यावर पोलीस लक्ष ठेवतात, वेळोवेळी चलान आणि ओव्हर स्पीड रडार गन लावून गाड्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र इतक करुनही वारंवार अपघात होत आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Road accident, Video viral

    पुढील बातम्या