शिमला, 16 ऑक्टोबर : मैदान हे खेळाडुंसाठी सर्वात महत्त्वाचं ठिकाण असतं. जिद्द, चिकाटी आणि जिंकण्याची उर्जा-इर्षा याच मैदानातून खेळाडू शिकत असतात. याच मैदानात एका तरुणानं उतरुन थेट धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा तरुण नशा आणि रक्त मागत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हिमाचलची राजधानी शिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानात ड्रग्स घेतलेल्या तरुणानं धिंगाणा घातला. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रिज मैदानावर शूटिंग चालू होते, त्यादरम्यान नशेत असलेल्या एका युवकाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिथल्या लोकांनी या तरुणाची माहिती तातडीनं पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
हे वाचा-भयंकर! भररस्त्यात वर्दीत असलेल्या पत्नीला नवऱ्यानं केली बेदम मारहाण, VIDEO VIRAL
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण जोरजोत ओरडत होता. नशेचं साहित्य आणि रक्त मागत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या तरुणाची अवस्था ठिक दिसत नव्हती. हा तरुण हातात मिळेल त्या गोष्टी घेऊन खाली आपट होता. या तरुणाने कोणालाच इजा पोहोचवली नाही पण तिथे असलेल्या वस्तू खाली फेकून दिल्या. त्याच्या वागण्यामुळे नागरिकांना मनस्ताप झाला आहे. स्थानिकांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली असून या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.