Home /News /viral /

भरधाव जीपने दुचाकीला उडवलं, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

भरधाव जीपने दुचाकीला उडवलं, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

जखमी दुचाकीस्वारावर टांडा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.

    कांगडा, 04 सप्टेंबर : भरधाव जीपनं बाईकला धडक दिली आहे. ही धडक एवढ्या जोरात होती की जीप दुचाकीला चिरडून पुढे गेली. या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला-पालमपूर रस्त्यावर हा भयंकर अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गुरुवारीची एक घटना असून ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.या दुर्घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वार मेक्सिमस मॉलचा कर्मचारी असून कायस्थबाड़ी नगरोटा बंगवा इथला रहिवासी आहे. जखमी दुचाकीस्वारावर टांडा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. तर जीप चालक नरवाणा इथला रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. गाडी चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चालक दारूच्या नशेत होता असं सांगितलं जात आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. थोरच्या चालकास रोंगडच्या धर्मशाळा-पालमपूर मुख्य रस्त्यावरील सिव्हील मार्केट येथे दुचाकीला धडक दिली असता, बाईक पालमपूर बाजूने येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी जीप धर्मशाळेच्या दिशेने येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या