मराठी बातम्या /बातम्या /Viral /

धावत्या बसमधून बाहेर येत करू लागला स्टंट; तरुणासोबत पुढच्याच क्षणी घडली मोठी दुर्घटना, VIDEO

धावत्या बसमधून बाहेर येत करू लागला स्टंट; तरुणासोबत पुढच्याच क्षणी घडली मोठी दुर्घटना, VIDEO

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती बसला लटकून जॉन अब्राहमप्रमाणे स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काहीच वेळात त्याच्यासोबत जे काही घडतं ते पाहून वाटतं की यानंतर कदाचित तो कधीच स्टंट करण्याचा विचार करणार नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : आजकाल तरुणांना नेहमी काहीतरी वेगळं आणि तुफानी करून दाखवायचं असतं. या नादात अनेकदा ते आपला जीवही धोक्यात घालतात. इतकंच नाही तर अशा प्रयत्नांमध्ये अनेकांचे जीवही गेले आहेत. स्टंट करून दाखवणं प्रत्येकालाच जमत असं नाही. यासाठी लोक अतिशय मेहनत घेतात आणि भरपूर सरावानंतर यात ते परफेक्ट होतात. मात्र काही लोक काहीही विचार न करता स्टंट करायला जातात आणि भलतंच काहीतरी घडतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Stunt Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हसावं की हा स्टंट करणाऱ्याला सदबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करावी.

OMG! हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; फॅमिलीत आहेत तब्बल 2 कोटी 70 लाख नातेवाईक

अनेकदा तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की यात हिरो असे स्टंट करतात जे पाहून सगळेच हैराण होतात आणि लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती बसला लटकून जॉन अब्राहमप्रमाणे स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काहीच वेळात त्याच्यासोबत जे काही घडतं ते पाहून वाटतं की यानंतर कदाचित तो कधीच स्टंट करण्याचा विचार करणार नाही.

View this post on Instagram

A post shared by ABDYLOEV (@stefano_ricci_16)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती बसच्या दरवाजात उभा राहून बाहेरच्या बाजूला झुकला आहे. हे पाहून असं वाटतं की तो कोणालातरी आपल्या स्टंटने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. तो बसच्या दरवाजात उलट दिशेला चेहरा करून उभा आहे. इतक्यात अचानक रस्त्यात असलेल्या एका साईन बोर्डला त्याचं डोकं जोरात धडकतं.

विद्यार्थ्यांना शिक्षिकेनं दिली अजब शिक्षा; आधी आग लावली अन् मग.., VIDEO

व्हायरल होणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर stefano_ricci_16 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओ लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्यक्तीचं हे कृत्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही करत आहेत. काही यूजर्सचं म्हणणं आहे की असं करून तुम्ही स्वतःचाच जीव धोक्यात टाकता. तर काहींनी सल्ला दिला की या गोष्टी प्रोफेशनल लोकांनीच कराव्या.

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video