Home /News /viral /

धक्कादायक! आकाशातून नवऱ्यावर कोसळली वीज; बायकोने रेकॉर्ड केला भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

धक्कादायक! आकाशातून नवऱ्यावर कोसळली वीज; बायकोने रेकॉर्ड केला भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

पावसाचं मनमोहक दृश्य कैद करायला गेलेल्या पत्नीच्या कॅमेऱ्यात तिच्याच नवऱ्यावर विजेच्या रूपाने कोसळलेलं संकटही कैद झालं.

    वॉशिंग्टन, 07 जुलै : पावसाळा जितका आनंद देणारा तितकाच तो भयानकही आहे. या काळात बऱ्याच दुर्घटना होत असतात. मुसळधार पावसामुळे होणारे अपघात, दरड कोसळणं, वीज कोसळणं अशा घटना घडतात (Lightning strike video). वीज कोसळल्याच्या घटनेचा असाच एक शॉकिंग व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका व्यक्तीवर वीज कोसळली आणि धक्कादायक म्हणजे त्याच्या बायकोच्या कॅमेऱ्यातच हे भयंकर दृश्य कैद झालं आहे. धडकी भरवणाऱ्या या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे (Lightning strike on husband wife recorded video). अमेरिकेच्या फ्लोरिडातील ही घटना आहे. एडवर्ड वालेन नावाची ही व्यक्ती 1 जुलैला हायवेवर मिनी ट्रकमधून आपल्या घरी जात होती. त्याच्या ट्रकच्या मागे त्याची पत्नी मिशेल दुसऱ्या गाडीतून येत होती.  त्याचवेळी अचानक जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. आता असं दृश्य असेल तर कुणीही ते कॅमेऱ्यात टिपण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. मिशेलसुद्धा हे दृश्य पाहून भारावली आणि तिने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करण्याचा प्रयत्न केला. हे वाचा - बापरे बाप! आकाशातून झाडावर कोसळला 'आगीचा गोळा'; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य; पाहा VIDEO तिने मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. इतक्यात तिच्या कारच्या पुढे असणाऱ्या ट्रकवर अचानक कोसळली, ज्यामध्ये तिचा नवरा होता. मनमोहक असा व्हिडीओ रेकॉर्ड करायला गेलेल्या मिशेलच्या कॅमेऱ्यात तिच्याच नवऱ्यावर कोसळलेलं संकटही कैद झालं. तिच्या डोळ्यादेखत तिच्या नवऱ्यावर वीज कोसळली. आज तकच्या वृत्तानुसार Fox13 न्यूजशी बोलताना मिशेलने सांगितलं, जेव्हा ती कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होती, तेव्हा आकाशात तिने वीज चमकत असल्याचं पाहिलं. काही समजण्याच्या आतच आकाशातून वीज कोसळली ती थेट तिच्या नवऱ्याच्या ट्रकवर आणि क्षणात ट्रकला आग लागली. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हे वाचा - VIDEO - तुफानी पावसातही जोमात निघाली वरात; भिजू नये म्हणून वऱ्हाड्यांनी केला जबरदस्त जुगाड या भयंकर घटनेचा व्हिडीओ हिल्सबोरो काऊंटी शेरिफच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी हिल्सबोरो काऊंटीच्या अधिकाऱ्याची कारही मिशेलच्या कारच्या पुढे होती, या कारचंही नुकसान झालं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, Viral, Viral videos, World news

    पुढील बातम्या