पाटणा 26 मे : प्रेमाचं अजब प्रकरण समोर आलं आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रेयसीने प्रियकराच्या ऑफिसमध्ये पोहोचून जबरदस्तीने त्याची कॉलर पकडली आणि ओढत त्याला लग्नासाठी मंदिरात नेलं. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक हे सगळं बघतच राहिले. या घटनेचा हायव्होल्टेज ड्रामा अनेक तास सुरू होता.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना गुरुवारी सकाळी 10 वाजता मधुसूदनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भतोडिया गावात घडली. प्रेयसीचा आरोप आहे की, तिचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंधही झाले असून ती दीड महिन्याची गरोदर आहे.
लूडो खेळता खेळता एकमेकांच्या प्रेमात पडले सासू-जावई; गावकऱ्यांना समजताच प्रेमकथेचा Shocking शेवट
लग्नासाठी दबाव आणल्याने प्रियकराने तिच्या डोक्यात सिंदूर भरून तिला आपल्या घरी नेलं. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी तिला स्विकारण्यास नकार दिला. तेव्हापासून लग्नाबाबत बोललं की प्रियकर सतत ते टाळायचा. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि प्रेयसीने प्रियकरावर महिला पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा तरुण जामिनावर कोर्टातून बाहेर आल्यानंतर प्रेयसीने त्याच्यावर पुन्हा लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
यानंतर ती खलिफा बाग चौकात नव्याने बांधलेल्या घरात पोहोचली. तिचा प्रियकर तिथे कामाला होता. त्यानंतर तिने प्रियकराची कॉलर पकडून त्याला ओढत बुढानाथ मंदिरात नेलं. या नाट्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेमी युगुलाला गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेलं. दोघांच्या नातेवाईकांनाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Love, Viral news