मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - ...अन् रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या टीसीचा झाला 'पुतळा'; जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

VIDEO - ...अन् रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या टीसीचा झाला 'पुतळा'; जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

टीसीवर कोसळला 'मृत्यू'

टीसीवर कोसळला 'मृत्यू'

रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या टीसीसोबत घडली भयंकर दुर्घटना.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • West Bengal, India
  • Published by:  Priya Lad

कोलकाता, 08 डिसेंबर : आतापर्यंत रेल्वे स्टेशनवरील दुर्घटनेचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यात चालत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना, रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना अपघात होणं अशा घटना घडतात. पण सध्या असा रेल्वे स्टेशनवरील असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. प्लॅटफॉर्म उभा राहून बोलणाऱ्या टीसीसोबत भयंकर घडलं आहे.

उभ्या उभ्या, बोलता बोलता टीसीची अक्षरशः पुतळाच झाला आहे. या टीसीसोबत असं काही घडलं ज्याचा कुणी विचारही केला नसेल. पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

हे वाचा - अरे देवा! इच्छापूर्तीसाठी हत्तीच्या पायाखालून गेला आणि तरुणाचं काय झालं पाहा VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन टीसी एकमेकांसोबत प्लॅटफॉर्मवर उभं राहून बोलत आहेत. इतक्यात अचानक विजेची तार तुटते आणि ती एका टीटीईच्या डोक्यावर पडते. त्यावेळी स्पार्क होतानाही दिसतो. टीसीला करंट लागतो आणि तो तसाच उलटा प्लॅटफॉर्मवरून खाली रेल्वे रूळांवर पडतो. सर्वकाही इतकं अचानक घडतं की त्याच्यासोबत असलेला दुसरा टिसीही घाबरतो आणि तो तिथून दूर पळून जातो.

@Ananth_IRAS ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या खडगपूर रेल्वे स्टेशनवरील आहे. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

First published:

Tags: Railway, Viral, Viral videos