नवी दिल्ली, 10 डिसेंबर : अनेकवेळा मुसळधार पाऊस किंवा जीर्ण झालेल्या इमारती पडतानाचे व्हिडीओ पाहिले असतील किंवा इमारत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातानाचा देखील एक व्हिडीओ चीनमधून काही दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता. आता 144 मजल्यांची इमारत अवघ्या 10 सेकंदात जमीनदोस्त झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
अबुधाबी इथे 144 मजली इमारत 10 सेकंदात कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या इमारतीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवण्यात आलं आहे. इतकी उंच इमारत यापेक्षा कमी सेंकदात जमीनदोस्त कधीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.
हे वाचा-OMG! शेकडो माशांना पुरून उरला बदल; एका घासासाठी कसा भिडला पाहा VIDEO
फेसबुक पेजवर 8 डिसेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत 7 हजारहून अधिक लाइक्स आणि 500 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. 165 मीटर उंच असेल्या या टॉवरला नियंत्रित डायनामाइट लाऊन ही इमारत पाडण्यात आली. 915 किलोग्रॅमचे 3000 हून अधिक डिटोनेटर्स यामध्ये वापरण्यात आले होते.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की इमारतीतून हळूहळू धुरळा निघतो आणि एकदम इमारत कोसळते. एक क्षण नुसता धुरळा उडतो आणि 10 सेकंदात संपूर्ण इमारत जमीनदोस्त होते. सोशल मीडियावर या व्हिडीओला युझर्सनी खूप लाइक केलं आहे. इतका कमी वेळा इमारत पाडल्याची ही प्रथमच घटना असल्याचं सांगितलं जात आहे.