मराठी बातम्या /बातम्या /Viral /भलमोठं गळ्यातलं, गडद मेकअप; नवरीचा लुक पाहून व्हाल हैराण, पाहा Video

भलमोठं गळ्यातलं, गडद मेकअप; नवरीचा लुक पाहून व्हाल हैराण, पाहा Video

व्हायरल

व्हायरल

भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. आपल्या लग्नात आपण खूप छान दिसावं अशी प्रत्येक मुलगा मुलीची इच्छा असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 21 मार्च : भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. आपल्या लग्नात आपण खूप छान दिसावं अशी प्रत्येक मुलगा मुलीची इच्छा असते. विशेषतः मुली तर आपल्या लग्नासाठी खूप उत्सुक असतात. लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात काय घालणार त्यावर काय मेकअप करणार, कोणती ज्वेलरी घालणार अशा सर्वच गोष्टींची प्लॅनिंग करतात. मात्र अनेकदा काहीजण लग्नामध्ये काहीतरी हटके करण्याच्या नादात काहीतरी विचित्र करुन बसतात. मग असे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरस होतात. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वधू तिच्या लग्नाचा ड्रेस फ्लॉंट करताना दिसत आहे. जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या या लेहेंग्यामध्ये वधू तिचे दागिने दाखवत आहेत. पण लोकांची नजर नववधूकडे कमी आणि तिच्या सोन्याच्या हारकडे जास्त गेली. तिचे दागिने आणि मेकअप पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा -  मध्यरात्र, रिकामा रस्ता आणि दुचाकी बिघडली; पुढे घडलं असं.....CCTV VIDEO समोर

वधूचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर aryan_love_gagan नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यात नववधूने घातलेल्या हाराची खिल्ली उडवली जात आहे. नववधूचा हार पाहताच लोकांनी कमेंट बॉक्समध्ये तिची खिल्ली उडवली. निगेटिव्ह कमेंट्स जास्त आल्यावर त्याचा कॉमेंट सेक्शन बंद करावा लागला. तोपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झाला.

जेथे प्रत्येक वधू लग्नात सर्वात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते, परंतु या व्हिडिओने मुलीच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. मुलीने अतिशय सुंदर लेहेंगा घातला होता. पण दागिन्यांची तिची निवड आणि तिचा मेकअप तिची चेष्टा करतायेत. सोशल मीडियावर शेअर केल्यापासून ते लाखो वेळा पाहिले गेले आहे. नववधूचा मेकअप आणि लूक पाहून लोकांना हसू आवरता येत नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सतत पहायला मिळतात. लग्नामधील व्हिडीओंचा तर सोशल मीडियावर भडीमार सुरु असतो. अनेक निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात.

First published:
top videos

    Tags: Top trending, Viral, Viral news, Wedding