• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! गर्लफ्रेंडला 10 वर्षांपर्यंत खोलीत लपवून ठेवलं; लग्नानंतर गूढ उघड

बापरे! गर्लफ्रेंडला 10 वर्षांपर्यंत खोलीत लपवून ठेवलं; लग्नानंतर गूढ उघड

ही Love Story वेगळीच आहे. याचा आपण कधी विचारही करू शकत नाही.

 • Share this:
  केरळ, 20 सप्टेंबर : केरळमधील (Keral News) पलक्कड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने शेवटी आपल्या गर्लफ्रेंडसोबत दहा वर्षांनी लग्न केलं. मात्र ही दहा वर्षे या तरुणाने गर्लफ्रेंडला एका खोलीत लपून ठेवलं (man hide his girlfriend in a room for 10 years). रेहमान नावाच्या तरुणाने सजितासोबत कायदेशीर लग्न केलं आहे. एका स्थानिक सब रजिस्ट्रार कार्यालयात दोघांनी लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. आतापर्यंत तुम्ही ही अनोखी कहाणी कधी ऐकली नसेल. खरंच याची Love Story अनोखी आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ राज्य महिला आयोगाने (Kerala State Women's Commission) रेहमानविरोधात महिलेला बंदी ठेवण्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र यावेळी लक्षात आलं की, रेहमानने तब्बल 10 वर्षे आपल्या घरात गर्लफ्रेंडची सेवा केली. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. (Hide girlfriend in room for 10 years Mystery revealed after marriage) मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील पलक्कड येथील अयालूर गावातील एक तरुणी दहा वर्षांपूर्वी अचानक गायब झाली. कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी आशाच सोडून दिली. तरुणी तिच्या शेजारी राहणाऱ्या रेहमानच्या प्रेमात होती आणि एके दिवशी प्रेमी सजिताला रेहमानने आपल्या घरात लपवलं होतं. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा रेहमान विरोधात तक्रार करण्यात आली होती. हे ही वाचा-'दहन' आणि 'दफन'मध्ये अडकला मृतदेह; आई-पत्नीच्या वादातून मृत्यूनंतरही सुटका नाही यानंतर पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राहत आहोत. आणि भविष्यातही एकत्र राहण्याची इच्छा आहे. कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगीदेखील दिली आहे. जेव्हा रेहमानच्या कुटुंबीयांना याबाबत कळालं तर काही जणं खूष झाले मात्र अनेकांना हे आवडलं नाही. मात्र दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी बुधवारी पलक्कड जिल्ह्यातील नेनमारामध्ये कायदेशीर स्वरुपात लग्न केलं. यावेळी साजिताच्या आई-वडील लग्नात सामील झाले. मात्र रेहमानचे काही नातेवाईक लग्नात आले नाही. यावेळी लग्नात रेहमान आणि सजिताने मिठाई वाटली आणि लग्नात आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दिले.
  Published by:Meenal Gangurde
  First published: