Home /News /viral /

इथे चालते हत्ती'राज'; भररस्त्यात ट्रक थांबवून लेकरा-बाळांसह कुटुंबानं केलं ऊसाचं भोजन

इथे चालते हत्ती'राज'; भररस्त्यात ट्रक थांबवून लेकरा-बाळांसह कुटुंबानं केलं ऊसाचं भोजन

हा व्हिडीओ एकदा पाहाच...

    नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) हत्तीच्या कुटुंबाचा (Elephant) एक व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. त्याचं काय झालं, या हत्तीच्या कुटुंबीयाने रस्त्यावरून जाणारा एक ट्रक अडवला. इतकचं नाही तर ट्रक अडवल्यानंतर यातील कुटुंबाच्या मुख्य सदस्याने ट्रकवरील ऊस काढायला सुरुवात केली. आपल्या सोबत असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही तो ऊस काढून देऊ लागला. बराच वेळ हत्तीच्या कुटुंबाचं हे ऊसाचं भोजन सुरू होतं. सर्व कुटुंबीय आनंदात (Elephant Herd Eats Sugarcane) ऊसाचा आस्वाद घेत होते. बराच वेळ ट्रक रस्त्यावर उभा होता. हत्तीच्या कुटुंबीयांचं जेवण होईपर्यंत ट्रक उभाच होता. दरम्यान हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट सर्विसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्ती, हत्तीणी आणि त्यांची मुलं ट्रकसमोर उभे आहेत. हत्ती ट्रकमधून ऊस काढत रस्त्यावर टाकत आहे. कुटुंबातील इतर सदस्य ऊस उचलून खायला लागतात. ट्रकमधील एक व्यक्ती व्हिडीओ शूट करीत आहे. हे ही वाचा-'जॉबकी खुशी तूम क्या जानो...'भररस्त्यात तरुणी लागली नाचायला, पाहा मजेशीर VIDEO सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अत्यंत शांतपणे कर घेतला जात आहे. दक्षिण भारतात कोणा एक ठिकाणी हत्ती अशा प्रकारे टॅक्स वसूल करताना दिसत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sunder elephant, Viral video.

    पुढील बातम्या