Home /News /viral /

VIDEO: माणसांना पाहताच भडकले हत्ती; आक्रोश करत मागे लागला संपूर्ण कळप, पाहा पुढे काय घडलं

VIDEO: माणसांना पाहताच भडकले हत्ती; आक्रोश करत मागे लागला संपूर्ण कळप, पाहा पुढे काय घडलं

सध्या सोशल मीडियावर हत्तींचा एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Elephants) झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नदीच्या काठावर माणसांना पाहून हत्ती भडकतात

    नवी दिल्ली 27 जून : जंगलाच्या दुनियेत हत्ती (Elephant) हा सर्वात सुखी प्राणी समजला जातो. तो आपल्याच जगात मग्न असतो. मात्र, अनेकदा हेच हत्ती जंगलात असा गोंधळ घालतात की सगळेच घाबरून जातात. आपल्या सर्वांना माहिती आहे, की जंगलातील माणसांचा वाढता हस्तक्षेप यामुळे जंगली प्राण्यांच्या (Wild Animals) अस्तित्वावरच संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे, प्राण्यांना राग येणं सहाजिकच आहे. कारण, मनुष्य त्यांच्याकडून त्यांचा निवाराच हिसकावून घेत आहेत. आपल्या भागात केलं गेलंल कोणतंही अतिक्रमण हत्तींना अजिबातही आवडत नाही. सध्या सोशल मीडियावर हत्तींचा एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Elephants) झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नदीच्या काठावर माणसांना पाहून हत्ती भडकतात आणि त्यांना तिथून पळवण्यासाठी हत्तींचा संपूर्ण कळपच (Herd of Elephants) माणसांच्या मागे धावू लागतो. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी साकेत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी म्हटलं, की आपल्याच जमिनीत बेघर. वेगानं घटणारी जंगलांच्या संख्येचा दुष्परिणाम. VIDEO : सतत कान खाजवायची महिला, मायक्रोस्कोपमधून पाहिलं तर डॉक्टरही झाले हैराण या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की काही लोक हत्तींजवळ जातात आणि त्यांच्या रस्त्यात उभा राहतात. हे पाहून हत्तींना राग अनावर होतो. हत्तींनी ज्याप्रकारे आपल्या राग व्यक्त केला आहे तो आक्रोश संपूर्ण जंगलभर घुमतो. हत्तींचा कळप या माणसांच्या मागे धावू लागतो. ओ तेरी! इतके जबरदस्त ठुमके लगावले की पँटही घसरली; डान्सचा मजेशीर VIDEO VIRAL सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरनं म्हटलं, की मानवाला आपल्या चुकींची शिक्षा तर एक दिवस भोगावी लागणारच आहे. तर, आणखी एकानं लिहिलं आहे, की आपण प्राण्यांच्या आय़ुष्यात गरज नसताना दखल का देतो, हेच समजतं नाही. हा व्हिडिओ बातमी देईपर्यंत 4 हजारहून अधिकांनी पाहिला होता तर अनेकांनी व्हिडिओ शेअर आणि लाईकही केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या