वलसाड, 06 जानेवारी : वाहतुकीच्या नियमांतर्गत दुचाकी चालकांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. गुजरात सरकारनेही अनिवार्य हेल्मेट लागू केले आहे. तरीही असे बरेच लोक आहेत जे दुचाकी किंवा स्कूटी चालविताना हेल्मेट घालत नाहीत. आता गुजरातमधील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा जीव एका हेल्मेटमुळे वाचला. जर त्याने हेल्मेट घातला नसता, तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता.
ही घटना वलसाडच्या उदवारा रेल्वे फाटकाजवळ घडली. फाटक बंद होत असतानाच जोरदार वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. फाटकावर डोके आपटताच दुचाकीस्वार खाली पडला. या तरुणाच्या गाडीचे नुकसान झाले असले तरी, त्याचा जीव वाचला.
वाचा-VIDEO अमरिकेचा बदला कोण घेणार? सुलेमानिंच्या मुलीचा इराणच्या राष्ट्रपतींना सवाल
वाचा-पिझ्झा बेक होता होता त्याखाली शिजला साप! ओव्हन उघडल्यानंतर बेशुद्ध झाली तरुणी
रेल फाटक लगते समय जल्दी में पटरी क्रॉस कर रहा था बाइक सवार, हेलमेट ने बचाई जान, VIDEO pic.twitter.com/4QTk23WYdG
— renuka dhaybar (@renu96dhaybar) January 6, 2020
वाचा-गोलंदाजाची बॉलिंग पाहून घाबरला फलंदाज अन् टाकली विकेट, VIDEO VIRAL
वाचा-फेसबुक LIVE करतानाच झाला भीषण अपघात, भयानक VIDEO आला समोर
या तरुणाचा जीव वाचला तो हेल्मेटमुळे. या तरुणाने हेल्मेट घातले असल्यामुळं त्याला फारशी दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तैनात असलेला रेल्वे कर्मचारी गेट बंद करत होता, पण एकामागून एक वाहन आल्यामुळे तो जास्त वेळ गेट बंद करू शकला नाही. अखेरीस तो गेट बंद करतो त्याचवेळी हा दुचाकीस्वार फाटकावर आदळतो. हेल्मेटमुळे जीव वाचल्यानंतर गुजरात पोलिसांनी हेल्मेटचे फायदे लोकांना सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.