Home /News /viral /

VIDEO : इवल्याशा चिमुकल्याने हातात आणली गवताची काडी; पाहून जिराफाने जे केलं ते मन जिंकणारं

VIDEO : इवल्याशा चिमुकल्याने हातात आणली गवताची काडी; पाहून जिराफाने जे केलं ते मन जिंकणारं

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक छोटा मुलगा प्राणीसंग्रहालयात फिरताना आपल्या हातात गवताचा एक लहानसा तुकडा उचलून घेतो.

    नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : शेअरिंग इज केअरिंग (Sharing is Caring) ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. मात्र याचं ताजं उदाहरण आज आम्ही तुम्हाला एका व्हिडिओच्या (Viral Video of Little Boy and Giraffe) माध्यमातून दाखवणार आहोत. लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं म्हटलं जातं. हे अगदी खरं आहे. त्यांच्या मनात काहीही भेदभाव नसतो, मग त्यांच्यासमोर एखादा प्राणी असो किंवा माणूस. आपण एखाद्या मोठ्या प्राण्याला बघताच त्याच्यापासून दूर धावण्याचा विचार करतो. मात्र आता एका चिमुकल्याने आपल्या कृत्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक छोटा मुलगा प्राणीसंग्रहालयात फिरताना आपल्या हातात गवताचा एक लहानसा तुकडा उचलून घेतो. यानंतर तो जवळच असलेल्या एका लांब जिराफाजवळ जातो आणि आपल्या हातातील गवत या जिराफाला खाण्यासाठी देण्याचा प्रयत्न करतो. जिराफ लहान मुलाच्या हातातील हे गवत खाण्याचा प्रयत्न करतं, मात्र अपयशी ठरतं. यानंतर हे जिराफ पुन्हा एकदा प्रयत्न करून चिमुकल्याच्या हातातील गवत खातं. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. आतापर्य़ंत 47 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, तुम्हीही कितीही लहान असाल तरीही जेवढं शक्य आहे तेवढं मनापासून शेअर करा आणि तुम्ही कितीही मोठे असला तरीही विनम्रतेनं ते स्वीकारा.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Videos viral, Viral video on social media

    पुढील बातम्या