मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral Video : दंड देण्याऐवजी न्यायाधीशांनीच केली 'त्या' मुलीची मदत; काय आहे नेमकं प्रकरण?

Viral Video : दंड देण्याऐवजी न्यायाधीशांनीच केली 'त्या' मुलीची मदत; काय आहे नेमकं प्रकरण?

व्हायरल

व्हायरल

रोजच्या धावपळीत आणि गर्दीमध्ये लोकांना पार्किंगमुळे खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा पार्किंगवरुन, पार्किंगच्या तिकिटांवरुन बराच गोंधळ होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 जानेवारी : रोजच्या धावपळीत आणि गर्दीमध्ये लोकांना पार्किंगमुळे खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा पार्किंगवरुन, पार्किंगच्या तिकिटांवरुन बराच गोंधळ होतो. काहींना तर नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यामुळे त्यांची गाडीही उचलून घेऊन जातात. गाडी सोडवण्यासाठी बरेच कुटाणे त्यांना करावे लागतात. यासाठी लोकांना भरमसाठ दंड भरावा लागतो. सध्या अशीच काहीशी घटना समोर आली आहे मात्र यावेळी न्यायाधीशाने दंड ठोठावण्याऐवजी मदत केली आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक मुलगी कोर्टमध्ये उभी आहे आणि समोर बेंचवर बसलेले न्यायाधीश तिला शिक्षा सुनावत आहेत. खरं तर, मुलीचा आरोप होता की तिच्याकडे पार्किंगचे स्टिकर्स नव्हते आणि तरीही तिने नो पार्किंगमध्ये कार पार्क केली. न्यायाधीशांना पाहून मुलगी घाबरली. महापालिका न्यायालयाचे न्यायाधीश फ्रँक कॅप्रिओ यांनी तिला दंड ठोटावण्याऐवजी तिची मदत केली. तिच्यावर फक्त 20 डॉलर्सचा दंड ठोठावला आणि तिला सूटही दिली की ती तिला पाहिजे तेव्हा ते पैसे जमा करू शकते. यामागचं कारण होतं मुलीची परिस्थिती.

जेव्हा मुलीने न्यायाधीशांना तिची परिस्थिती सांगितली की ती 10 महिन्यांच्या मुलाची आई आहे आणि ती एक सिंगल मदर आहे. हे ऐकून न्यायाधीशांनी तिला पन्नास डॉलर्स दिले जेणेकरून ती यामधून तिच्या मुलाची काळजी घेईन. न्यायाधिशांनी तिला सल्लाही दिला की जेव्हा तो इतरांना मदत करण्यास सक्षम होईल तेव्हा तीने हे पैसे एखाद्या गरीब व्यक्तीला परत केले पाहिजेत.

दरम्यान, हा व्हिडिओ ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले की, 'जर मला अमेरिकेतून कोणाला भारतात आणण्याची परवानगी मिळाली तर मी यांना नक्कीच आणेन.' या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ 26 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि कमेंट करून न्यायाधीश फ्रँक कॅप्रिओ यांना जगातील सर्वोत्तम न्यायाधीश म्हणत आहेत.

First published:

Tags: Court, Social media viral, Video viral, Viral, Viral news