गर्दीच्या असलेल्या रस्त्यावर फिरतेय शीर नसलेली व्यक्ती, धक्कादायक VIDEO VIRAL

गर्दीच्या असलेल्या रस्त्यावर फिरतेय शीर नसलेली व्यक्ती, धक्कादायक VIDEO VIRAL

अचानक समोर डोकं नसलेली व्यक्ती येऊन उभा राहिली किंवा चालू लागली तर धक्का बसेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही मजेशीर तर काही धक्कादायक असे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ भीतीदायक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. गर्दीच्या रस्त्यात एक माणूस चालत आहे पण त्याचं डोकं दिसत नाही. अशा या डोकं नसलेल्या माणसाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याची माहिती मिळाली नाही. रस्त्यावर ट्राफीक दिसत आहे आणि एक व्यक्ती फिरताना दिसतो. यात त्याचं डोकं मात्र दिसत नाही. त्या व्यक्तीच्या हातात एक लाल रंगाची बॅगही दिसत आहे. लोकांची ये जा असलेल्या ठिकाणी एखादी व्यक्ती डोकं नसताना चालते तरीही त्यांची काहीच धक्कादायक प्रतिक्रिया नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रस्त्यावरून कोणीतरी डोकं नसलेला माणूस फक्त त्याचं धड चालत आहे हे पाहिलं तरी अनेकांना धक्का बसेल. सगळे त्याच्याभोवती जमा होतील. पण या व्हिडिओत असं काहीच होत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ एडिटेड आहे की काय अशीही शंका येते.

फेबरी एडिक्सन नावाच्या यूट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. टिकटॉक, फेसबुक आणि ट्विटरवरसुद्धा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे ते समोर आलेलं नाही. तसंच संबंधित व्यक्तीने ट्रिक वापरल्याचं नाकारता येत नाही. पण तरीही गर्दीच्या ठिकाणी अशी ट्रिक वापरली तरी लोक त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नसल्यानं व्हिडिओ एडिटेड असण्याची शक्यता आहे.

क्रिकेट सामन्यात कुत्र्याने केलं क्षेत्ररक्षण, सोशल मीडियावर व्हिडीओ VIRAL

अबब! 3280 फूट उंचीवर उडणाऱ्या फुग्यावर केला डॉन्स! 'त्यानं' बनवला नवा रेकॉर्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Viral
First Published: Feb 27, 2020 07:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading